लासुर्णेतील द्राक्षे जाणार श्रीलंका, मलेशियाला
By admin | Published: December 26, 2016 02:10 AM2016-12-26T02:10:07+5:302016-12-26T02:10:07+5:30
येथील दीपक भोसले या शेतकऱ्याने निर्यातक्षम द्राक्षोत्पादनाची परंपरा कायम ठेवली आहे. सहा वर्षांपासून भोसले यांची द्राक्षे
लासुर्णे : येथील दीपक भोसले या शेतकऱ्याने निर्यातक्षम द्राक्षोत्पादनाची परंपरा कायम ठेवली आहे. सहा वर्षांपासून भोसले यांची द्राक्षे एक्स्पोर्ट (परदेशात) होत आहेत. यंदाही भोसले यांची द्राक्ष श्रीलंका, मलेशिया येथे विक्रीसाठी जाणार आहेत. यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे सांगितले.
भोसले यांची दोन एकर जम्बो सिडलेस नावाच्या वाणाची द्राक्ष बाग आहे. त्यांनी या दोन एकर क्षेत्राचे छाटणीसाठी तीन टप्पे केले आहेत. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी बागेची छाटणी केली आहे.
तो माल ५ जानेवारीच्या दरम्यान तोडण्यास येणार आहे. या मालासाठी व्यापारी येत आहेत.
भोसले यांनी एका झाडाला लोड होऊ नये म्हणून फक्त २२ द्राक्षाचे घड ठेवले असल्याने या फळांचे घड भरपूर मोठे झाले आहेत.
यामुळे आपल्या दोन एकरामधील ३० गुंठे क्षेत्रात ८ टन माल निघणार असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच या मालाला परदेशात १३० ते १४० रुपये प्रतिकिलो दर मिळणार असल्याने त्यांना ३० गुंठे क्षेत्रात १० ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे भोसले यांनी सांगितले. (वार्ताहर)