लछमन हर्दवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार

By admin | Published: February 4, 2016 01:39 AM2016-02-04T01:39:40+5:302016-02-04T01:39:40+5:30

सिंधी, मराठी व हिंदी या भाषांचे ज्येष्ठ लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांना दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद

Lachman Hardwani's lifetime achievement award | लछमन हर्दवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार

लछमन हर्दवाणी यांना जीवनगौरव पुरस्कार

Next

पुणे : सिंधी, मराठी व हिंदी या भाषांचे ज्येष्ठ लेखक, अनुवादक, कोशकार व भाषातज्ज्ञ प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांना दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद’ या संस्थेतर्फे ‘साहित्य सन्मान’ तथा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या रविवारी (दि. ७) इंदूर (मध्य प्रदेश) येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती
इराणी यांच्या हस्ते पुरस्कारवितरण होईल.
प्रा. हर्दवाणी यांची सिंधी, मराठी व हिंदी या भाषांत आजपर्यंत ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मतानुसार, संस्कृतपासून निघालेल्या सिंधी भाषेची मूळ-स्वाभाविक लिपी देवनागरीच आहे. ब्रिटिश सरकारच्या काळात तिची लिपी अरेबिकमध्ये कृत्रिमरीत्या करण्यात आली होती.
(प्रतिनिधी)

Web Title: Lachman Hardwani's lifetime achievement award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.