सुविधांचा अभाव, नवीन बसची घाई, पीएमपीकडून पायाभूत सोयींकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 04:00 AM2018-05-27T04:00:08+5:302018-05-27T04:00:08+5:30
प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर ५०० इलेक्ट्रिक बस आणि ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना या बससाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
पुणे - प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर ५०० इलेक्ट्रिक बस आणि ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेत असताना या बससाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा, आगार, पार्किंग तसेच इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशनची जागा, वर्कशॉपचे सक्षमीकरण, संगणकीकरण, सध्याच्या बसची देखभाल-दुरुस्ती याकडे काणाडोळा केला जात आहे.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या मालकीच्या सुमारे १,१५० आणि भाडेतत्त्वावरील ६५३ अशा सुमारे १,८०० बस आहेत. सध्याची मात्र, त्यापैकी प्रत्यक्षात केवळ १,३०० ते १,४०० बस मार्गावर असतात. सध्याची प्रवासी संख्या आणि पुणे व पिंपरी-चिंचवड या शहरांची वाढत जाणारी लोकसंख्या यांचा विचार केल्यास पीएमपीला सुमारे ३ हजार बसची गरज आहे. त्याअनुषंगाने मागील काही वर्षांपासून सातत्याने बसखरेदीचा मुद्दा चर्चेला येतो.
बुधवारी संचालक मंडळाच्या बैठकीत ५०० ई-बस, ४०० सीएनजी व १०० डिझेलवरील बस घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच यापूर्वीच बसखरेदीसाठी काढण्यात आलेल्या दोन्ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या. एकीकडे बसखरेदीचा निर्णय होत असताना संचालक मंडळाच्या बैठकीत सोयीसुविधा वाढविण्याच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्ष झालेले दिसते.
सध्या पीएमपीची ठिकठिकाणी १३ आगार आहेत. दोन्ही
शहरांचा पसारा पाहता आगारांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.
या आगारांची सध्याची जागा
अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे
बस पार्किंगचा मुद्दा सतत
ऐरणीवर येतो. बहुतेक आगारांच्या शेकडो बस रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. बसच्या देखभाल-दुरुस्तीबाबतही सातत्याने नाराजी व्यक्त केली.
याकडे दुर्लक्ष होत असल्याने मार्गावर ब्रेकडाऊन होणाºया
बसचे प्रमाण वाढत आहे.
त्यासाठी वर्कशॉपच्या सक्षमीकरणाची गरज व्यक्त केली जाते. संगणकीकरणामध्येही पीएमपी
खूप मागे आहे. मुख्य भांडार व
इतर भांडारांमध्ये समन्वयाचा
अभाव आहे. त्यामुळे सुट्या
भागांचा पुरवठा सुरळीतपणे
होत नाही.
चालक-वाहकांची नाराजी
चालक, वाहक तसेच इतर कर्मचाºयांनाही पीएमपीकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. चालक-वाहकांच्या विश्रांती कक्षांची दुरवस्था झालेली असते. मुख्य बस स्थानकांवर आवश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे कर्मचाºयांमध्येही नाराजी आहे.
नवीन बससाठी जागेचे नियोजन सुरू करण्यात आलेले आहे. जागा निश्चित करण्यात आल्या असून, दोन्ही पालिकांशी याबाबत चर्चा सुरू आहे. आगार, बस स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. इतर सोयीसुविधांबाबत दोन्ही पालिका व पीएमपीमध्ये समन्वय साधला जात आहे. त्याबाबत नियमित बैठका सुरू आहेत.
- सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी
नवीन बसमधील यंत्रणाही सातत्याने बंद पडतात. या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. केवळ बस खरेदी करून वाहतुकीचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इतर पूरक बाबीही सक्षम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रवासी सुविधांकडे दुर्लक्ष
पुणे व पिंपरी-चिंचवड तसेच लगतच्या परिसरात विविध मार्गांवर बस धावतात. बहुतेक मार्गांवरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झालेली आहे. प्रवाशांना ऊन, वारा, पावसापासूून संरक्षण मिळत नाही. काही ठिकाणी थांबे नाहीत. काही मुख्य बस स्थानकांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही, अपुरी बैठकव्यवस्था अशी अवस्था आहे. अनेक बस खिळखिळ्या झाल्या आहेत. तुटलेल्या खुर्च्या, खिडक्या व उचकटलेले पत्रे, असे चित्र पाहायला मिळते.
प्रवाशांच्या अपेक्षा - नवीन बस
आवश्यकच, पण...
जुन्या बसकडे दुर्लक्ष नको
खिळखिळ्या बस सुधाराव्यात
ब्रेकडाऊन कमी करावे
बस स्थानकांमध्ये सुविधा असाव्यात
बसथांबे सुस्थितीत असावेत
बस वेळेत याव्यात
ब्रेकडाऊनची माहिती प्रवाशांना मिळावी
पीएमपीच्या ताफ्यात सध्या मालकीच्या सुमारे १,१५० आणि भाडेतत्त्वावरील ६५३ अशा सुमारे १,८०० बस आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ १,३०० ते १,४०० बस मार्गावर असतात.