स्मार्ट रस्त्यांवर स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 02:58 PM2018-08-30T14:58:00+5:302018-08-30T14:59:10+5:30
शहरातील अनेक रस्त्यांवर झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात न अाल्याने पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत अाहे.
पुणे : पुणे शहराची वाटचाल ही स्मार्टसिटी कडे हाेत अाहे. शहरात विविध विकासकामे सध्या सुरु अाहेत. शहराती अनेक रस्ते हे सुशाेभित केले असून ते अाता शहराची अाेळख बनले अाहेत. असे असताना या स्मार्ट रस्त्यांवर मात्र स्मार्ट क्राॅसिंगचा अभाव अाहे. शहरातील अनेक चाैकांमध्ये झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे न अाखल्याने सिग्नल लागल्यानंतर नेमके थांबायचे कुठे असा प्रश्न वाहनचालकांना पडला अाहे.
पुण्यातील अनेक रस्त्यांची नव्याने रचना करण्यात अाली अाहे. त्यात जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्याचाही समावेश अाहे. जंगली महाराज रस्त्यावरील अनेक चाैकांमध्ये झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात अालेले नाहीत. त्यामुळे सिग्नल लागल्यानंतर थांबायचे कुठे असा प्रश्न वाहनचालकांना पडला अाहे. तर रस्ता अाेलांडताना पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत अाहे. पुणे वाहतूक विभागाकडून सीसीटिव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येताे. यात सिग्नल लागल्यानंतर झ्रेब्रा क्राॅसिंगच्या पुढे थांबणाऱ्या वाहनचालकांची संख्या अधिक अाहे. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखण्यात न अाल्याने सीसीटिव्हीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कारवाईचा उपयाेग हाेत नसल्याचे चित्र अाहे.
दरम्यान अशीच परिस्थीती शहरातील इतर काही रस्त्यांची सुद्धा अाहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या चाैकांमध्ये झ्रेब्रा क्राॅसिंगचे पट्टे अाखावेत अशी मागणी नागरिक करीत अाहेत.