व्हेंटिलेटर बेडची कमतरता - ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर शहरात आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:26+5:302021-04-03T04:09:26+5:30

पुणे : शहरात दिवसाकाठी चार-साडेचार हजार नवे कोरोनाबाधित वाढत असून, आजमितीला शहरात ३५ हजारांहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत़ ...

Lack of ventilator beds - Ventilators from rural areas will be brought to the city | व्हेंटिलेटर बेडची कमतरता - ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर शहरात आणणार

व्हेंटिलेटर बेडची कमतरता - ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर शहरात आणणार

Next

पुणे : शहरात दिवसाकाठी चार-साडेचार हजार नवे कोरोनाबाधित वाढत असून, आजमितीला शहरात ३५ हजारांहून अधिक सक्रिय रूग्ण आहेत़ यापैकी गंभीर रूग्ण हे हजाराच्या आसपास असले तरी, सध्या पुणे महापालिका हद्दीतील रूग्णालयात केवळ ४८६ व्हेंटिलेटर बेडपैकी केवळ ११ बेड रिक्त आहेत़

शहरातील वाढती रूग्णसंख्या व जिल्ह्यातून तथा बाहेरील जिल्ह्यातून शहरात येणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा पाहता, शहरातील रूग्णालयांतील आॅक्सिजन बेडसह व्हेंटिलेटर बेड कमी पडण्याची दाट शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये वापराविना व तज्ज्ञ डॉक्टरांअभावी पडून असलेले व्हेंटिलेटर बेड शहरातील महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये आणण्यात येणार आहेत़ याबाबतचे आदेश खुद्द उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच प्रशासनाला दिले आहेत़

-----------------

चौकट १

पुणे जिल्ह्यात शहर व पिंपरी-चिंचवड शहर मिळून सुमारे ९९६ व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत़ यापैकी शहरी भागात २ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५९३ (रिक्त ११), पिंपरी-चिंचवड शहरात १२६ (रिक्त ५०), व जिल्ह्यात २७७ बेड असून, यापैकी साधारणत: १५० बेड रिक्त असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़

--------------------

कोट :-

शहरातील वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता, सद्यस्थितीला उपलब्ध व्हेंटिलेटर बेडही कमी पडणार आहेत़ त्यामुळे शहरातील बहुतांशी खाजगी रूग्णालयांमधील ८० टक्के बेड ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येत आहे़ यामध्ये अधिकाधिक आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेड घेण्याचा आमचा प्रयत्न आहे़ जे यास नकार देतील त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत़

डॉ़ मनीषा नाईक,

सहाय्यक आरोग्य प्रमुख पुणे मनपा

---------------------------------

Web Title: Lack of ventilator beds - Ventilators from rural areas will be brought to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.