'बोलायचे आहे म्हणून टेरेसवर नेले अन्...', वासनांध भाडेकरूचे संतापजनक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 10:12 AM2022-11-21T10:12:34+5:302022-11-21T10:14:37+5:30

भाडेकरूच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल...

lady home owner Taken to the terrace the outrageous act of a lustful tenant | 'बोलायचे आहे म्हणून टेरेसवर नेले अन्...', वासनांध भाडेकरूचे संतापजनक कृत्य

'बोलायचे आहे म्हणून टेरेसवर नेले अन्...', वासनांध भाडेकरूचे संतापजनक कृत्य

googlenewsNext

पुणे/प्रतिनिधी/किरण शिंदे : पुण्यातील सहकारनगर परिसरातून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका व्यक्तीने संतापजनक कृत्य केले आहे. घर भाडे मागण्यासाठी आलेल्या मालकिणीसोबत त्याने अश्लील कृत्य केले. तुमच्याशी खाजगीत बोलायचे आहे असे म्हणून त्याने मालकिणीला टेरेसवर नेले आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या कृत्याने संतापलेल्या मालकीनीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत हनुमंत लोखंडे (वय 45) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाडेकरूचे नाव आहे. याप्रकरणी एका 43 वर्षीय महिलेने सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक सप्टेंबर रोजी सर्व प्रकार घडला होता. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी धनकवडी परिसरात फिर्यादी यांच्या फ्लॅटवर भाड्याने राहतो. काही महिन्यांपूर्वी फिर्यादीच्या पतीचे निधन झाले आहे. 2019 पासून फिर्यादीने फ्लॅटचे भाडे दिले नाही. याशिवाय तो फिर्यादी महिलेकडे घाणेरड्या नजरेने देखील पाहायचा. दरम्यान काही दिवसांपूर्वी फिर्यादी या घर भाडे मागण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीला बोलायचे आहे असे म्हणून टेरेसवर नेले. 

टेरेसवर गेल्यानंतर आरोपीने मी तुला सांभाळतो असे म्हणून फिर्यादी यांच्या अंगचटीला जाण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांचे कपडे काढून स्वतःकडे ओढण्याचाही प्रयत्न केला. या सर्व प्रकाराला विरोध करत फिर्यादीने पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगताच आरोपीने शिवीगाळ केली आणि त्यांच्या मुलांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. सहकार नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: lady home owner Taken to the terrace the outrageous act of a lustful tenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.