‘भामा-आसखेड’मध्ये ‘लेक टँपिंग’ आणि बोगदाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:16+5:302020-12-04T04:28:16+5:30

पुणे : ‘लेक टॅपिंग’ हा शब्द आपण आजपर्यंत कोयना धरणाशी निगडित बातम्यांमध्ये वाचला़ पण हेच ‘लेक टॅपिंग’ भामा ...

Lake tamping and tunneling in Bhama-Askhed | ‘भामा-आसखेड’मध्ये ‘लेक टँपिंग’ आणि बोगदाही

‘भामा-आसखेड’मध्ये ‘लेक टँपिंग’ आणि बोगदाही

Next

पुणे : ‘लेक टॅपिंग’ हा शब्द आपण आजपर्यंत कोयना धरणाशी निगडित बातम्यांमध्ये वाचला़ पण हेच ‘लेक टॅपिंग’ भामा आसखेड धरणामध्येही वेगळ्या स्वरुपात करण्यात आले आहे. या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने ‘जँकवेल’च्या तळाशी ३० मीटर खोल जाऊन बोगदा घेतला आहे. त्यासाठी सहा मीटरचा तळाचा खडक फोडण्यात आला. पाणीपुरवठा अखंड होत राहावा यासाठी हे दिव्य महापालिका अभियंत्यांनी करून दाखविले आहे़

‘जॅकवेल’च्या तळाशी ३० मीटर खोल अंतरावर पाण्याखालील बोगदा खणणे, जँकवेलपासून साडेआठ किलोमीटर अंतरावर एकाच ठिकाणी ‘पंपिंग’चा करून हे पाणी पुढे साधारणत: ३४ किलोमीटर अंतरावर नैसर्गिक गुरुत्वाकर्षणाने पोहोचवणे अशी वेगळी कामे ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पात’ साकारून महापालिका अभियंत्यांनी स्थापत्यकलेतला उत्कृष्ट नमूना सादर केला आहे.

------------------

फोटो मेल केला आहे

फोटो ओळी : धरणातील अधिकाधिक पाणी खेचण्यासाठी धरणाच्या मध्यभागी तळाखाली बोगदा खोदण्यात आला आहे.

------------------------

‘भामा-आसखेड’ एक दृष्टीक्षेप

* प्रकल्पास मान्यता : २० फेब्रुवारी २०१३

* प्रत्यक्ष कामाला सुरूवात : मार्च २०१४

* प्रकल्प पूर्णत्त्व कालावधी : सात वर्षे

* प्रकल्प खर्च : ४१८ कोटी

* शेतकरी पुनर्वसन खर्च : १३५ कोटी

* प्रकल्प खर्चातील हिस्सा : केंद्र - ५० टक्के, राज्य - २० टक्के व महापालिका ३० टक्के

---------------------

Web Title: Lake tamping and tunneling in Bhama-Askhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.