गलांडवाडीत पपई पिकामुळे लखपती
By admin | Published: October 14, 2016 05:16 AM2016-10-14T05:16:39+5:302016-10-14T05:16:39+5:30
तीस गुंठे क्षेत्रात पपईचे पीक घेऊन सात महिन्यांत अडीच लाखांची कमाई करण्याची किमया इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ गावाचे युवा शेतकरी तात्या गाडेकर
शैलेश काटे / इंदापूर
तीस गुंठे क्षेत्रात पपईचे पीक घेऊन सात महिन्यांत अडीच लाखांची कमाई करण्याची किमया इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नं. १ गावाचे युवा शेतकरी तात्या गाडेकर यांनी केली आहे.
गलांडवाडी नं. १ हे उजनी पाणलोट क्षेत्रातील एक गाव. पाणलोट क्षेत्रातील शेती म्हटले, की हजारो एकरभर पसरलेला ऊसच आठवतो. मात्र, जादा पाणीवापरामुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. जमिनीचे संवर्धन व्हावे.
तिचा पोत टिकून राहावा. कमी खर्चात वेगळी उत्पादने घेता यावीत अशा पद्धतीचे शेतीतंत्र स्वीकारलेल्या आणि कृषीविषयक स्वच्छ व निकोप दृष्टी असणाऱ्या युवा पिढीतील शेतकऱ्यांपैकी गाडेकर हे एक शेतकरी.
शेती विकसित करण्यासाठी तीन-चार वर्षांपूर्वी गाडेकर यांनी
सुमारे साडेचार किलोमीटर
अंतरावरील पाणलोट क्षेत्रामधून जलवाहिनीद्वारे शेतात पाणी आणले.
या हंगामात ३० गुंठे क्षेत्रात तैवान ७८६ जातीच्या पपईची ७२०
रोपांची १२ बाय ६ एवढ्या अंतरावर मल्चिंग पेपरचा वापर करून लागवड
केली. ठिबक सिंचन संचाद्वारे
पाणी देण्याची व्यवस्था केली.
प्रत्येक रोपाला चांगले पाणी दिले जाईल अशा पद्धतीने ड्रिप अंथरली. त्यामुळे या पिकाला पाणीही
कमी लागले.
झाडांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पिकाच्या गरजेप्रमाणे औषधफवारणी केली. फलधारणेसाठी विद्राव्य खतांची मात्रा, बुरशीनाशके कीटकनाशकाचा वापरही योग्य प्रमाणात केला. पपईसह
डाळिंब, ढोबळी मिरची व गरजेपुरती भाजीपाल्याची ही पिके त्यांनी
घेतली.