एलईडी बल्ब बसविण्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार
By Admin | Published: July 6, 2017 02:55 AM2017-07-06T02:55:54+5:302017-07-06T02:55:54+5:30
पिंपळे जगताप येथील ग्रामपंचयातीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांच्याकडून अपहार झाल्याची तक्रार माजी सरपंच
लोकमत न्यूज नेटवर्क
केंदूर : पिंपळे जगताप येथील ग्रामपंचयातीच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांच्याकडून अपहार झाल्याची तक्रार माजी सरपंच शिवाजी जगताप व रघुनाथ टाकळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
संबंधित बल्ब खरेदी मरकळ व भोसरी परिसरातून करण्यात आली असून, प्रत्यक्षात दुकानेच नसल्याचे निदर्शनास आल्याचे माजी सरपंच शिवाजी जगताप यांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडून बल्ब खरेदी करताना लाखो रुपयांची खरेदी होत असताना ई-टेंडरिंग होणे अपेक्षित होते. मात्र, मर्जीतील ठेकेदाराकडून आयएसओ मार्क नसलेले बल्ब वापरून लाखो रुपयांचा चुरडा ग्रामपंचायतीने केला आहे. एलईडी बल्बची गुणवत्त प्रमाणपत्र देखभाल-दुरुस्तीची संबंधित कंपनी किंवा एजन्सीचा करारनामा करणे बंधनकारक असतानाही तसे केल्याचे आढळून आलेले नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. सर्व दिवे बसविताना महावितरण कंपनीची पूर्वपरवानगी घेतेलेली नाही. फक्त १४७ बल्बच बसविण्यात आल्याचा अजब
कारभार झालेला आहे. पुणे जिल्हा परिषदेने परिपत्रकही ग्रामपंचायतीस दिलेले असून, चायना मेड स्वरूपाचे निकृष्ट बल्ब खरेदी करण्यास सांगितलेले नाही.
तसेच दर्जेदार खरेदी होण्यासाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. या गावात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी प्रोसिडिंग पुस्तकावर सदर बाब बेकायदा असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. मात्र, तरीही ५ लाखांची खरेदी करण्याचा अजब कारभार करण्यात आलेला आहे.
पिंपळे जगताप ग्रामपंचायतीची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. अहवाल तयार करण्यात आलेला आहे.
- बी. आर. गायकवाड,
विस्तार अधिकारी शिरूर
अस्तित्वात नसलेल्या
दुकांनाकडून बल्बची खरेदी
जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची पूर्वपरवानगी घेतलेली नाही.
लाखो रुपयांची खरेदी होत असताना ई-टेंडर केलेले नाही.
ई-टेंडरिंग टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने खरेदी.
पुणे जिल्हा
परिषदेचे परिपत्रक
ग्रामपंचायत हद्दीत वाड्या/वस्त्यांवर विद्युत दिवे एलईडी, सौर पथदिवे बसविण्यास जिल्हा परिषदेची परवानगी घेण्याबाबत परिपत्रक देण्यात आलेले आहे. त्यामध्ये स्ट्रीट लाईट रजिस्टर ठेवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परवानगी बंधनकारक, स्ट्रीट लाईट दुरुस्तीचे लॉग बुक ठेवण्यात यावे, वीज मंडळाची पूर्वपरवानगी, ई-टेंडरिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, देखभाल-दुरुस्ती व करारनामा, सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करण्यात यावे.
या स्वरूपाचे पालन न करता ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक निधीचा अपव्यय केल्याचे समजले जाऊन कार्यवाही करण्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.
१,२५० चा बल्ब केला
३ हजारांना खरेदी
पिंपळे जगताप परिसरात एलईडी बल्प बसविण्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मासिक मीटिंगमध्ये ग्रामविकास अधिकारी यांचे मत डावलून २५० बल्प नगांची खरेदी करण्यात आल्याचे ९ मे १७च्या ग्रामसभेत सांगण्यात आले आहे.
एका बल्बची किंमत १,२५० असतानाही ती ३,००० रुपयांना प्रतिनगाने खरेदी करण्याचा कारभार ग्रामपंचायतीने केला आहे.