लाखभर घेणार प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:57+5:302020-12-26T04:09:57+5:30

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याकडे दुर्लक्ष करतात. जखमींना तातडीने उपचार मिळाल्यास अनेकांचा जीव वाचू ...

Lakhs of first aid training | लाखभर घेणार प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण

लाखभर घेणार प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण

Next

रस्त्यावर अपघात झाल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याकडे दुर्लक्ष करतात. जखमींना तातडीने उपचार मिळाल्यास अनेकांचा जीव वाचू शकतो. पण अनेकदा नागरिकांना प्राथमिक उपचारांबाबत माहिती नसल्याने त्यांना रुग्णालयात नेईपर्यंत उपचार मिळत नाहीत. उपचाराला विलंब झाल्याने जखमींचा जीवही जातो. या कालावधीला गोल्डन अवर म्हटले जाते. त्यामुळे सेनापती बापट रस्त्यावरील लोकमान्य रुग्णालयाने एक लाख नागरिकांना प्राथमिक उपचारांचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला नुकतीच सुरूवात झाली. आमदार सिध्दार्थ शिरोळे, नगरसेवक आदित्य माळवे, उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य, डॉ. सुकुमार सरदेशमुख उपस्थित होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी उपक्रमाची माहिती दिली. डॉ. वैद्य यांनी प्रात्यक्षिकासह उपचारांबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Lakhs of first aid training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.