Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी

By नितीश गोवंडे | Updated: January 1, 2025 17:28 IST2025-01-01T17:26:38+5:302025-01-01T17:28:40+5:30

२०७ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाई महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता

Lakhs of Ambedkarite followers gather to pay their respects on the occasion of 2070th Bravery Day | Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी

Koregaon Bhima: २०७ व्या शौर्य दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायींची अभिवादनासाठी गर्दी

पुणे: कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन लाखो आंबेडकरी अनुयायींच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १० लाख अनुयायी बुधवारी (दि. १) विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडून देखील होणारी गर्दी लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. यावेळी विविध नेतेमंडळींनी देखील अभिवादनासाठी हजेरी लावली.

२०७ वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाई महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. १ जानेवारी १९२७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून याठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. बुधवारी २०७ व्या विजयदिनी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन केले होते. समता सैनिक दलासह महार रेजिमेंट कडून विजयस्तंभास मानवंदना देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आनंदराज आंबेडकर यांसह इतर नेत्यांनी भेट देत विजयस्तंभाला अभिवादन केले.

कोरेगाव भीमा या ठिकाणी बुधवारी (1 जानेवारी) 207 वा शौर्य दिन साजरा होत आहे. कोरेगाव भीमा विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यंदा आठ ते दहा लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विजय स्तंभास अभिवादन केले.

Web Title: Lakhs of Ambedkarite followers gather to pay their respects on the occasion of 2070th Bravery Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.