काटेरी झुडपात आढळला लाखो रुपये किंमतीचा औषधसाठा; इंदापूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 07:01 PM2021-03-11T19:01:28+5:302021-03-11T19:02:41+5:30

आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामगिरीचे पुन्हा एकदा दर्शन

Lakhs rupees worth of medicines in government hospitals found; Incidents in Indapur taluka | काटेरी झुडपात आढळला लाखो रुपये किंमतीचा औषधसाठा; इंदापूर तालुक्यातील घटना

काटेरी झुडपात आढळला लाखो रुपये किंमतीचा औषधसाठा; इंदापूर तालुक्यातील घटना

googlenewsNext

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब निमसाखर रस्त्यावरील १४ चाळ येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काटेरी झुडपात लाखो रुपये किंमतीचा शासकीय दवाखान्यातील औषधसाठा फेकून दिल्याची घटना घडली. या प्रकारामुळे आरोग्य विभागाच्या ढिसाळ कामगिरीचे पुन्हा एकदा दर्शन झाल्याने नागरिकांमधून आरोग्य खाते विषयी नाराजीचा सूर उमटला आहे. 

कळंब,वालचंदनगर आणि निमसाखर या गावांच्याजवळ चौदा चाळ येथे आज ( गुरुवारी ) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना आरोग्य विभागाच्या खात्यातील रुपये किमतीचा औषध साठा काटेरी झुडपात फेकून दिल्या दिल्याचे दिसून आले. यावेळी संबंधित कार्यकर्त्यांनी तात्काळ इंदापूर तहसीलदार गट विकास अधिकारी आरोग्य अधिकारी व वालचंद नगर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधून काटेरी झुडपात औषधसाठा अस्ताव्यस्त पडल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी पी.एस. गुडले, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह आरोग्य सहाय्यक व्ही. ए. मदने, व्ही. सी.पापत तसेच कळंब येथील आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी व्ही.आर. राक्षे व संदीप एकतपुरे आणि क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपलब्ध औषध साठ्यांचा पंचनामा केला.

लासुर्णे येथील वैद्यकीय अधिकारी पी. एस.गुडले म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ४१ प्रकारची औषधे याठिकाणी आढळून आली. यामध्ये चाळीस औषधे कालबाह्य झालेले असून ओआरएस म्हणजे जलसंजीवनी याची ५४६ पाकिटे उपयुक्त आहेत. शासकीय नियमानुसार कालबाह्य झालेली औषधे जाळणे किंवा खड्ड्यात पुणे असे असताना सदर अशी औषधे रस्त्यालगत काटेरी झुडपे टाकल्यामुळे त्या औषधाचा गैरवापर झाला असता. कालबाह्य झालेली औषधे ही विषच असतात या औषधांचा वापर झाल्यास मुकी जनावरे अथवा माणसे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता, ज्यांनी ही गंभीर चूक केली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले. 

याबाबत क्रांतीसूर्य सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते म्हणाले, "आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो रुपयांची औषधे रस्त्यावर पडलेले आहेत. यामध्ये टॅबलेट इन्सुलिन सिरीज मेडिसिन बॉटल्स असून सदर औषधाचा पंचनामा झाला आहे ज्यांनी चूक केली आहे त्यांना शिक्षा केली जावी" अशी मागणी गोरख खंडागळे घनश्याम निंबाळकर व सचिन सविंदर यांनी केलीआहे.
 

Web Title: Lakhs rupees worth of medicines in government hospitals found; Incidents in Indapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.