स्कूल बसचालकांना लाखाचा दंड

By admin | Published: December 22, 2016 02:47 AM2016-12-22T02:47:17+5:302016-12-22T02:47:17+5:30

विद्यार्थी वाहतूक नियमांंचे पालन न करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा

Lakhs of school bus operators | स्कूल बसचालकांना लाखाचा दंड

स्कूल बसचालकांना लाखाचा दंड

Next

पुणे : विद्यार्थी वाहतूक नियमांंचे पालन न करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उभारला असून, बुधवारी जप्त केलेल्या ६० वाहनांपैकी १८ वाहनांकडून १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
आरटीओने मंगळवारी १३२ वाहनांची तपासणी केली होती. त्यात ७७ वाहने दोषी आढळली होती. त्यातील ६० वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या वाहनांपैकी १८ वाहनचालकांनी तातडीने आरटीओने आकारलेला दंड, कर व व्यवसाय कराचा भरणा केला. यात दंड स्वरूपात १ लाख ५ हजार २०० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कर स्वरूपात ४ हजार ६०७, तर व्यवसाय कराच्या स्वरूपात ५ हजार २८५ रुपयांचा भरणा करून घेतला.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी राज्य सरकारकडून विद्यार्थी वाहतूक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार दरवर्षी स्कूल बसचे पासिंग करून घेणे, बसला विशिष्ट रंग देणे, फायर बॉक्स, प्रथमोपचार पेटी बसविणे, चालकाकडे वाहन परवाना असणे, बसच्या पायऱ्यांचा आकार, वाहन योग्यता प्रमाणपत्र अशा विविध अटी घालून दिल्या आहेत. मात्र, या नियमावलीकडे स्कूल बसचालक दुर्लक्ष करीत आहेत. विद्यार्थ्यांचे पालकही आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन योग्य आहे की नाही, याची शहानिशा करीत नाहीत. कोणताही पालक मुलांना बसमध्ये बसविताना बसची पाहणी करीत नाही. त्यामुळे बसचालकही नियमांची पायमल्ली करीत आहे.
प्रत्येक पालकाने स्कूल बस, व्हॅनची पाहणी करणे गरजेचे आहे. मुलांना सुरक्षितपणे शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांनी जबाबदारी उचलायला हवी, तरच विद्यार्थी वाहतूकदारांवर अंकुश ठेवता येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत म्हणाले.

Web Title: Lakhs of school bus operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.