लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे स्वच्छतादूत आणि पोलिसांना सॅनिटायझर, मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:12 AM2021-05-12T04:12:55+5:302021-05-12T04:12:55+5:30

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त (चैत्र अमावास्येला) समाजोपयोगी उपक्रम व पुष्पआरास केली. ...

Lakshmibai Dagdusheth Dattamandir Trust provides sanitizers, masks to sanitation envoys and police | लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे स्वच्छतादूत आणि पोलिसांना सॅनिटायझर, मास्क

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे स्वच्छतादूत आणि पोलिसांना सॅनिटायझर, मास्क

googlenewsNext

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त (चैत्र अमावास्येला) समाजोपयोगी उपक्रम व पुष्पआरास केली. सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे यांच्या हस्ते स्वच्छता किट दिले. दरवर्षी मोगरा महोत्सव मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने पुष्पआरास करण्यात आली.

दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्ताने इस्कॉन पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन चिकोडे, जनसंपर्क अधिकारी भक्ती भोसले व दत्तमंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती झाली.

Web Title: Lakshmibai Dagdusheth Dattamandir Trust provides sanitizers, masks to sanitation envoys and police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.