कोरोना काळातही लाला बँकेच्या ठेवी, कर्जात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:34+5:302021-03-10T04:11:34+5:30

नारायणगाव : लाला बँकेने कोरोनाच्या काळातही ठेवी व कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली असून सरकारी रोखे विक्रीतून ४ कोटी ...

Lala Bank deposits, increase in loans even during the Corona period | कोरोना काळातही लाला बँकेच्या ठेवी, कर्जात वाढ

कोरोना काळातही लाला बँकेच्या ठेवी, कर्जात वाढ

Next

नारायणगाव : लाला बँकेने कोरोनाच्या काळातही ठेवी व कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली असून सरकारी रोखे विक्रीतून ४ कोटी ५० लाख नफा मिळविलेला आहे . सभासदांसाठी २ लाखाचा अपघाती विमा काढलेला असून सभासदाचा र अपघात झाल्यास ५० हजारांचा विमा लाभ देणारी एकमेव लाला बँक आहे , अशी माहिती लाला अर्बन को- ऑप बँकेचे अध्यक्ष ॲड . निवृत्ती काळे यांनी दिली.

लाला बँकेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण वार्षिक सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकूल येथे झाली. यावेळी उपाध्यक्ष नितीन लोणारी , संचालक , मनसुख भंडारी , अशोक गांधी , जगदीश फुलसुंदर , विमल थोरात , सुनिता साकोरे , सचिन कांकरिया , जैन्नुददीन मुल्ला, नारायण गाढवे , डॉ . सचिन कांबळे , मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावळकर , उपमुख्य कार्यकारी प्रदिप मोरे आदी उपस्थित होते .

या ऑनलाईन सभेत सभासदांनी सहभाग दर्शवून सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली .

सभेत सभासदांनी व्यवस्थापकीय मंडळ स्थापन करण , मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूकीसाठी मान्यता , एक रकमी कर्ज परत फेड योजने अंतर्गत दिलेल्या कर्जाच्या सूट आदी सह सर्व विषयांना मान्यता दिली . त्याच प्रमाणे बाजारपेठ शाखेच्या नियोजित नवीन बांधकाम इमारतीसाठी मान्यता देण्यात आली . कर्ज व्याज दर कमी करावेत अशी सूचना सभासदांनी केली .

बँकेचे उपाध्यक्ष नितीन लोणारी यांनी आर्थिक वर्षात दिवंगत झालेले बँकेचे ज्येष्ठ संचालक स्व. तात्यासाहेब गुंजाळ , डॉ. हिरालाल शहा , अशोक शहा , प्रल्हाद बाणखेले यांना श्रद्धांजली अर्पण केली .

अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सभासदांसाठी लाभांश करिता ६७ लाख ३५ हजारांची तरतूद करण्यात आली आहे , कर्मचारी वर्गासाठी मेडिक्लेम पॉलीसी काढण्यात आली आहे ,बँकेचे कामकाज रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शन तत्वानुसार चालू आहे , अशी माहिती देऊन सभासंदाच्या प्रश्नांचे निरासरण केले .

बँकेचे सभासद ह.भ.प. सोपान शिंदे , चित्तरंजन कोरे , विठूल महामुनी , सागर दांगट , संदिप भेके , सी.ए चंद्रकांत कासट , गजू चौगुले , कैलास वाळूज , संभाजी कुऱ्हाडे आदी सभासदांनी वार्षिक सभेत सहभाग घेतला .

शरद निसाळ व सतिश जाधव यांनी सुत्रसंचालन केले . सचिन कांकरिया यांनी आभार मानले .

फोटो - लाला बँकेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दीपप्रज्वलन करताना अध्यक्ष ॲड . निवृत्ती काळे , उपाध्यक्ष नितीन लोणारी , अशोक गांधी , जगदीश फुलसुंदर , विमल थोरात , सचिन कांकरिया , जैन्नुददीन मुल्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावळकर , उपमुख्य कार्यकारी प्रदीप मोरे .

Web Title: Lala Bank deposits, increase in loans even during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.