लाला बँकेला आठ कोटींचा नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:11 AM2021-04-09T04:11:20+5:302021-04-09T04:11:20+5:30

८.०१ कोटी नफ्यातून तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू. २ कोटी ५१ लाख नफा झालेला असून नेट एनपीएचे ...

Lala Bank makes a profit of Rs 8 crore | लाला बँकेला आठ कोटींचा नफा

लाला बँकेला आठ कोटींचा नफा

Next

८.०१ कोटी नफ्यातून तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू. २ कोटी ५१ लाख नफा झालेला असून नेट एनपीएचे प्रमाण २.८९ टक्के ठेवण्यात बँकेला यश मिळाले आहे. संचालक मंडळ, प्रशासन व कर्मचारी यांनी काटेकोरपणे केलेल्या नियोजनामुळेच बँकेला यश संपादन करता आले आहे. कोरोनाच्या काळातही बँकेनी अविरत ग्राहकांना सेवा देऊन प्रसंगी कर्मचाऱ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

बँकेने चालू आर्थिक वर्षात रोखे विक्रीतून ४ कोटी ५० लाख नफा मिळविला आहे. ठेवी व कर्जात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. बँकेला झालेल्या विक्रमी नफ्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांचे योगदान खूप मोलाचे आहे.

बँकेच्या ठेवी ५०० कोटी व कर्ज ३५० कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट पुढील आर्थिक वर्षात ठेवलेले असून ते पूर्ण करण्याचा मानस आहे, असे बँकेचे अध्यक्ष काळे, उपाध्यक्ष लोणारी व प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे यांनी दिली.

Web Title: Lala Bank makes a profit of Rs 8 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.