राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर सेवा देणारी लाला बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:15 AM2021-08-21T04:15:10+5:302021-08-21T04:15:10+5:30
नारायणगाव : राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर लाला बँक व्यवसायात भरीव वाढ होण्याच्या दृष्टीने कर्जाचे व्याजदर, मार्केट रिलेटेड व स्पर्धात्मक ठेवण्यासाठी ...
नारायणगाव : राष्ट्रीयकृत बँकेच्या धर्तीवर लाला बँक व्यवसायात भरीव वाढ होण्याच्या दृष्टीने कर्जाचे व्याजदर, मार्केट रिलेटेड व स्पर्धात्मक ठेवण्यासाठी रेटिंग सिस्टिम सुरू केली आहे. त्यानुसार पात्र कर्जदारांना त्यांचे कर्जाचे व्याजदरात किमान १ टक्के कमाल ४ टक्के इतक्या दराने रिबेट मासिक पद्धतीने दिले जाणार आहे. ग्राहकांना अशी सुविधा देणारी ग्रामीण भागातील पहिली लाला बँक असल्याचे गौरोवोउद्गार बँकेचे अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे यांनी नारायणगाव येथे काढले.
लाला अर्बन को-ऑप. बँकेचा ४७ वा वर्धापनदिन बँकेच्या मुख्य कार्यालयात नारायणगाव परिसरातील व्यापारी, सभासद यांच्या उपस्थितीत साजरा झाला. बँकेचे संस्थापक माजी खा. स्व. किसनराव बाणखेले यांचे प्रतिमेचे पूजन बँकेचे ज्येष्ठ सभासद सूर्यकांत गांधी व अशोक रत्नपारखी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष ॲड. निवृत्ती काळे, उपाध्यक्ष नितीन लोणारी, ज्येष्ठ संचालक मथुरानानी बाणखेले, मनसुखलाल भंडारी, जगदीश फुलसुंदर, अशोक गांधी, विमल थोरात, सुनीता साकोरे, सचिन कांकरिया, नारायण गाढवे, सचिन कांबळे, जैनुद्दीन मुल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. सुरम, आशिष माळवदकर, ॲड. शिवदास तांबे, राहुल पापळ, राजू कोल्हे, अनिल दिवटे, नित्यानंद देवकर आदी सभासद तसेच बँका व पतसंस्था यांचे अधिकारी व पदाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
ज्येष्ठ संचालक अशोक गांधी म्हणाले की, लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले यांनी ४७ वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून सुरू केलेली लाला बँकेची यशस्वी घौडदौड सुरू असून उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वसामान्यांची आणि जिव्हाळाची बँक असा लौकिक आहे.
याप्रसंगी सभासद अशोक रत्नपारखी, मेजर संतोष घोडके, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर पोखरणा, सूर्यकांत गांधी, माऊली लोखंडे, राजेंद्र बोरा, मच्छिंद्र मुंडलिक यांनी बँकेस शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले. संचालक सचिन कांकरिया यांनी आभार मानले.
---
फोटो क्रमांक : २० नारायणगाव राष्ट्रीयकृत लाला बॅंक
लाला अर्बन को- ऑप. बँकेचा ४७ वा वर्धापन दिन निमित्त बँकेचे संस्थापक माजी स्व. किसनराव बाणखेले यांचे प्रतिमेचे पुजन करताना जेष्ठ सभासद व संचालक मंडळ