बाबुर्डीतील घरफोडीत पाच तोळ्यांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:08+5:302021-08-22T04:13:08+5:30

सुपे : बाबुर्डीत अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सुमारे पाच तोळे सोने व रोख आठ हजारांची रक्कम सुऱ्याचा धाक ...

Lampas with five weights of jewelery in a burglary in Baburdi | बाबुर्डीतील घरफोडीत पाच तोळ्यांचे दागिने लंपास

बाबुर्डीतील घरफोडीत पाच तोळ्यांचे दागिने लंपास

Next

सुपे : बाबुर्डीत अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सुमारे पाच तोळे सोने व रोख आठ हजारांची रक्कम सुऱ्याचा धाक दाखवून लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीला घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबुर्डी येथील माणिक नारायण बाचकर यांच्या घरातील कपाटातील मंगळसूत्र, कानातील रिंगा, पायातील पट्ट्या असे ३ तोळ्यांचे दागिने आणि रोख साडेसहा हजार रुपये, तर शेजारील सुमन रामभाऊ बाचकर यांचे मंगळसूत्र आणि कानातील फुले असे २ तोळ्यांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सुमन बाचकर यांच्या गळ्याला सुरा लावून ‘गप्प बस नाही तर, डोक्यात सुरा घालून जागेवरच खल्लास करून टाकीन’ असा सज्जड दम देत गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने, मोबाईल काढून घेतले. हा दरोडा टाकताना कोणी शेजारील बाहेर येऊ नये यासाठी चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांच्या कड्या लावल्या होत्या.

तसेच शेखर बाचकर यांच्या घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त टाकून दिले पण तिथे त्यांच्या हाताला काही लागले नाही.

पहाटेच्यावेळी बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे आणि पोलीस पाटील वनिता लव्हे यांनी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख यांच्याशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. यावेळी सलिम शेख आणि हवालदार माहुरकर यांनी काही क्षणात घटनास्थळी तातडीने भेट दिली. तसेच गावाच्या शेजारी आजूबाजूला राहणाऱ्या संशयितांच्या वस्तीवर जाऊन तातडीने तपास केला. मात्र काही संशयास्पद आढळून आले नाही.

दरम्यान सहायक पोलीस निरिक्षक लांडे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, काही संशयित काळ्खैरेवाडी येथील एका ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे लांडे यांनी सांगितले. बाबुर्डीत अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून सहा तोळे सोने लंपास केले.

Web Title: Lampas with five weights of jewelery in a burglary in Baburdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.