वारज्यात भरदिवसा घरफोडीत १४ लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:12+5:302021-08-26T04:15:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे प्रकार वाढत असून, शहरात एकाच दिवसात चार ठिकाणी फ्लॅट फोडून लाखो ...

Lampas looted Rs 14 lakh in burglary | वारज्यात भरदिवसा घरफोडीत १४ लाखांचा ऐवज लंपास

वारज्यात भरदिवसा घरफोडीत १४ लाखांचा ऐवज लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे प्रकार वाढत असून, शहरात एकाच दिवसात चार ठिकाणी फ्लॅट फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वारजे येथे भरदिवसा बंद फ्लॅट फोडून तब्बल १४ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चतुश्रृंगी, हडपसर व लोणी काळभोर परिसरात घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी जेठाराम जोशी (वय ४८, रा. दिगंबरवाडी, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जोशी यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. रविवारी ते राखीपौर्णिमेनिमित्त बहिणीकडे गेले होते. त्यांचे कुटुंबही सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील रोकड, सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ते परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. बाणेर येथील उमेश डिगे (वय २१) यांचा बंद फ्लॅट फोडून १ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. तसेच, वडकी गावात वैभवकुमार शिर्के (वय २९) यांचे बंद घर फोडले आहे. चोरट्यांनी ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चौथी घटना हडपसर भागात घडली असून, येथील शॉपी फोडून १ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रामनाथ ठाकूर (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीसंगम किचन ट्रॉली नावाचे दुकान आहे. हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्री फोडले आहे.

Web Title: Lampas looted Rs 14 lakh in burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.