जारकरवाडी फाटा येथे ७० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:11 AM2021-03-05T04:11:12+5:302021-03-05T04:11:12+5:30

खेडेकर यांचे जारकरवाडी फाटा येथे रसवंती गृह व किराणा मालाचे दुकान असून रविवारी नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून ...

Lampas looted Rs 70,000 at Jarkarwadi Fata | जारकरवाडी फाटा येथे ७० हजारांचा ऐवज लंपास

जारकरवाडी फाटा येथे ७० हजारांचा ऐवज लंपास

Next

खेडेकर यांचे जारकरवाडी फाटा येथे रसवंती गृह व किराणा मालाचे दुकान असून रविवारी नेहमीप्रमाणे ते आपले दुकान बंद करून घरी आले होते. त्यानंतर दि. १ मार्चला ते सकाळी सात वाजता आपले दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या छताचा पत्रा त्यांना उचकटलेला दिसला. त्यावेळी त्यांनी आत जाऊन पाहिले असता किराणा साहित्य व सीसीटीव्ही मशीन, रसाचे मशीन अज्ञाताने लंपास केल्याचे निदर्शनास आले. या चोरीत ३० हजार रुपये किमतीचे उसाच्या रसाचे मशीन ,१५ हजार रुपये किमतीचा सीसीटीव्ही,डी.व्ही.आर मशीन व २५ हजार रुपये किंमतीचे किराणा साहित्य असे एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक हागवणे करत आहे.

Web Title: Lampas looted Rs 70,000 at Jarkarwadi Fata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.