बारामतीत ८० हजारांचे दागिने केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:10 AM2021-05-09T04:10:12+5:302021-05-09T04:10:12+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत दत्तात्रय परशुराम सुतार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा ...

Lampas made 80,000 ornaments in Baramati | बारामतीत ८० हजारांचे दागिने केले लंपास

बारामतीत ८० हजारांचे दागिने केले लंपास

Next

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत दत्तात्रय परशुराम सुतार यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा मुलगा विक्रम हा येथील भारत फोर्ज कंपनीत नोकरीस आहे. तब्येत बरी नसल्याने तो २ मे रोजी धामणेर (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे मूळ गावी गेला. दि. ६ रोजी शेजाऱ्यांनी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादीने तेथे जात पाहणी केली. या वेळी लाकडी कपाटातील सर्व वस्तू खाली पडलेल्या दिसल्या. कपाटाचे ड्रावर उचकटत अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीचा दोन तोळ्यांचा नेकलेस, ३० हजार रुपयांचे दीड तोळ्यांचे गंठण व १० हजार रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी चोरून नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Lampas made 80,000 ornaments in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.