दोन मंदिरात चोरी करून चांदीची मूर्ती मुखवटे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:42+5:302021-07-04T04:08:42+5:30

गारगोटवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर मारुती मंदिर आहे. या मंदिरात मारुती देवाची मूर्ती व शंकराची पिंड आहे. पिंडीशेजारी भैरवनाथ ...

Lampas stole silver idols in two temples | दोन मंदिरात चोरी करून चांदीची मूर्ती मुखवटे लंपास

दोन मंदिरात चोरी करून चांदीची मूर्ती मुखवटे लंपास

Next

गारगोटवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालया समोर मारुती मंदिर आहे. या मंदिरात मारुती देवाची मूर्ती व शंकराची पिंड आहे. पिंडीशेजारी भैरवनाथ देवाचे दोन मुखवटे होते. मंदिरात भाऊ गेणू गारगोटे हे पुजारी म्हणून काम पाहतात. सकाळी व संध्याकाळी देवाच्या पूजेसाठी ते मंदिर उघडतात. गुरुवारी (दि.१) नेहमीप्रमाणे त्यांनी मंदिर बंद केले होते. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कडीकोयंडा कापून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भैरवनाथ देवाचे सव्वादोन किलोचे ७० हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन मुखवटे लांबविले. दुसऱ्या दिवशी पुजारी गारगोटे हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता चोरीचा घटना समोर आली. त्याच रात्री या परिसरातील १० किलोमीटर अंतरावर घनवटेवाडी (ता. खेड) येथील माथोबा देवाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून माथोबा देवाची १० हजारांची पाव किलो चांदीची मूर्ती, ३४ हजारांचा देवाचा मुखवटा किंमत ३४ हजार रुपये असा एकून १ लाख ३४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. याबाबत अतुल ज्ञानेश्वर गारगोटे रा. गारगोटवाडी (ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड करित आहे.

Web Title: Lampas stole silver idols in two temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.