‘एटीएम’ची माहिती घेऊन पैसे केले लंपास

By admin | Published: May 13, 2017 04:40 AM2017-05-13T04:40:44+5:302017-05-13T04:40:44+5:30

येथील परिचारिकेच्या मोबाईलवर फोन करून एटीएम व आधार कार्डची माहिती घेऊन परिचारिका व तिच्या पतीच्या खात्यातील

Lampas took money from ATMs | ‘एटीएम’ची माहिती घेऊन पैसे केले लंपास

‘एटीएम’ची माहिती घेऊन पैसे केले लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : येथील परिचारिकेच्या मोबाईलवर फोन करून एटीएम व आधार कार्डची माहिती घेऊन परिचारिका व तिच्या पतीच्या खात्यातील साडेबारा हजार रुपये लंपास केल्याची घटना वाघोली येथील खांदवेनगर परिसरामध्ये घडली. तीन दिवसांत नागरिकांना फोन करून एटीएमची माहिती विचारून रक्कम लंपास केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा लोणीकंद पोलिसांत दाखल झाला आहे.
वाघोली येथील खांदवेनगर परिसरात जिल्हा परिषदेच्या मागे राहणाऱ्या एका परिचारिकेला सोमवारी (दि. ८) व मंगळवार (दि. ९) रोजी अनोळखी व्यक्तीने फोन केला. फोनद्वारे परिचारिकेकडून तिच्या व पतीच्या एटीएम, आधार कार्डची माहिती घेतली. यानंतर परिचारिकेच्या खात्यातील ४ हजार ६०० रुपये व तिच्या पतीच्या खात्यातील ८ हजार रुपये परस्पर काढून घेतले. रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याने लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आठवड्यामध्ये वाघेश्वर सोसायटीतील एका वृद्धाला रविवारी (दि. ७) रोजी अशाचप्रकारे एटीएमची माहिती विचारून ५० हजार रुपये लंपास करण्यात आले होते. या घटनेनंतर परिचारिकेला फोनद्वारे माहिती विचारून फसवणूक केल्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Lampas took money from ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.