प्रवासात वृद्धेच्या पिशवीतील दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:16 AM2021-09-16T04:16:23+5:302021-09-16T04:16:23+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाबाई मारुती सातपुते या मोशी येथून पुणे ते शिर्डी एसटी (एम. एच. ४०, एन. ...
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाबाई मारुती सातपुते या मोशी येथून पुणे ते शिर्डी एसटी (एम. एच. ४०, एन. ९३६२ ) या गाडीने प्रवास करीत असताना नारायणगाव एसटी स्टँड येथे एसटी १० ते १५ मिनिटे थांबली असता त्यात ३ अज्ञात महिला एसटी बसमध्ये चढल्या व त्यातील एक महिला गोपाबाई यांच्याशेजारी येऊन बसली. त्यानंतर त्या महिलेची हालचाल चालू झाली. त्यानंतर गोपाबाईंनी तिला तू उठ व दुसरीकडे बस असे सांगितले. त्यानंतर ती स्त्री उठून दुसरीकडे जाऊन बसली. आळेफाटा एसटी स्टँड येथे बस आल्यानंतर त्या बसमधील ३ अनोळखी महिला आळेफाटा एसटी स्टँड येथे उतरून निघुन गेल्या व गोपाबाई ह्या संगमनेर येथे एसटीने गेल्या. तेथे उतरल्यावर त्यांच्या जवळ असलेली बॅग त्यांनी तपासल्यानंतर एका बाजूला ती फाटलेली दिसली. त्या बॅगेतील ठेवलेले अंदाजे ४० हजार किमतीचे १ तोळे वजनाचे सोन्याचे पान व ३० हजार किमतीचे ८ ग्रॅमचे ७४ मणी असे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्यामुळे हे सोन्याचे दागिने एसटीतील अनोळखी महिलेनेच चोरून नेल्याची खात्री झाल्याने नारायणगाव पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हवालदार मोहरे हे करीत आहेत.