एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन

By admin | Published: April 1, 2017 02:22 AM2017-04-01T02:22:08+5:302017-04-01T02:22:08+5:30

मेहेंदळे गॅरेज परिसरातील झोपडीधारकांवर एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन कारवाई करण्यात आली. भल्या सकाळीच

Land acquisition for SRA project | एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन

एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन

Next

कोथरूड : मेहेंदळे गॅरेज परिसरातील झोपडीधारकांवर एसआरए प्रकल्पासाठी भूसंपादन कारवाई करण्यात आली. भल्या सकाळीच मोठा पोलीस बंदोबस्त, चार जेसीबी, आठ मालवाहू ट्रक घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना येथील रहिवासी म्हणाले की, झोपडी पाडताना जी तत्परता अधिकारी दाखवत आहेत, तीच कर्तव्यदक्ष भूमिका बिल्डरने व्यवस्थित काम करावे म्हणून तुम्ही दाखवणार का?
एसआरएने महापालिका व पोलिसांच्या सहकार्याने येथील जागा खाली करून घेतली. त्या वेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. एसआरएनुसार ५५ कुटुंबे पात्र आहेत. अपात्र कुटुंबांनी कोठे जायचे?, ज्यांनी बिल्डरबरोबर अ‍ॅग्रीमेंटला नकार दिला त्या लोकांची काय व्यवस्था करणार?, बिल्डरने ठरल्याप्रमाणे करार न पाळल्यास त्यावर कारवाई केल्याचे एकतरी उदाहरण तुमच्याकडे आहे का, असा प्रश्न येथील रहिवासी विचारत होते. अपात्र नागरिकांना वाऱ्यावर सोडू नये. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली.
येथील रहिवासी पद्मा चव्हाण म्हणाल्या, की पौड रस्त्यावरील केळेवाडी येथील स. नं. ४४ मधील झोपडीधारक १९९६ पासून हक्काच्या घराची वाट पाहत आहेत. संक्रमण शिबिरात किती वर्ष ठेवावे, यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याने बिल्डर गैरफायदा घेतात.
एसआरएच्या तहसीलदार गीता गायकवाड यांनी सांगितले, की राजेंद्रनगर येथे लाभार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. कायदेशीर कारवाई असून नागरिकांनी सहकार्य करावे.

Web Title: Land acquisition for SRA project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.