जमिनीच्या बदल्यात जमीन देणार

By admin | Published: April 30, 2017 05:20 AM2017-04-30T05:20:03+5:302017-04-30T05:20:03+5:30

पुरंदर येथील संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना फलटण

Land in exchange for land | जमिनीच्या बदल्यात जमीन देणार

जमिनीच्या बदल्यात जमीन देणार

Next

पुणे : पुरंदर येथील संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन देण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना फलटण येथील शेती महामंडळाची जमीन देण्यात येणार असून त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मान्यता दिली आहे.
वाघापूर, राजेवाडी, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वनपुरी आणि कुंभारवळण या गावांमधील गावठाण क्षेत्र वगळून अन्य जमीन संपादित केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडून जमिनीच्या बदल्यात जमिनीची मागणी केली जाईल. त्यांना फलटण येथील जमीन दिली जाईल.

- ‘एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने पुण्यातील सहा पर्यायी जागांपैकी पुरंदर येथील जमिनीला पसंती देत आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर काही गावांमधील स्थानिक ग्रामस्थांनी विमानतळासाठी जमीन देण्यास नकारही दिला होता. त्यावर शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत विमानतळ पॅकेज निश्चितीसाठी झालेल्या बैठकीत चारही पर्याय ठेवण्यात आले होते.

- चारपैकी कोणताही पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. बाधित शेतकऱ्यांना फलटण येथील जमीन देण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Land in exchange for land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.