आजींकडून शाळेला भूदान, माळवाडीच्या शाळेला दिली जमीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:03 AM2018-09-27T01:03:53+5:302018-09-27T01:04:09+5:30
एखाद्या व्यक्तीचे शिक्षणप्रेम व दानशुरता केवढी मोठी असू शकते याची नुकतीच प्रचिती तांदळी (ता. शिरूर) येटील ग्रामस्थांना आली आहे.
रांजणगाव सांडस - एखाद्या व्यक्तीचे शिक्षणप्रेम व दानशुरता केवढी मोठी असू शकते याची नुकतीच प्रचिती तांदळी (ता. शिरूर) येटील ग्रामस्थांना आली आहे. तांदळी येथील ७५ वर्षे वयाच्या शिक्षणप्रेमी आजींनी माळवाडीच्या जि. प. शाळेसाठी स्वमालकीची जागा दान देवून आपल्या दातृत्वाचेही प्रदर्शन घडविले आहे.
शिरूर तालुक्यातील माळवाडी प्राथमिक शाळेसाठी अंजनाबाई पोपटराव गदादे यांनी दिली स्वखर्चाने बक्षिसपत्र करून विनामूल्य ६ गुंठे जमीन दिली आहे. त्यांनी काल स्वत: शिरूर निबंधक (रजिस्टार) कार्यालयात येऊन स्वखर्चाने बक्षिसपत्र करून शाळेचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या ताब्यात हे दस्त ऐवज दिले. शिरूरचे तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी संदीप जठार आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. मुलांना शिक्षणासाठी चांगली इमारत व शाळेसाठी प्रशस्त जागा व्हावी, या उदात्त हेतूने गदादे आजींनी दिलेल्या या योगदानाचे परिसरातून कौतुक होत आहे. शिरूर पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे , त्यांचे बंधू संजय गदादे व विजय पोपट गदादे यांच्या त्या मातोश्री आहेत. त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांचा शासकीय अधिकाऱ्यांनी सत्कार केला.
यावेळी तांदळीचे शाळा व्यवस्थापन समिती विठ्ठल गदादे, गणेश गदादे, संचालक श्री दत्त सोसायटी तांदळीचे दत्ता गदादे, ग्रामपंचायत सदस्य मोहन गदादे, संतोष गदादे, विठ्ठल गदादे, दत्तू नलगे, माजी उपसरपंच भाऊसाहेब बनकर, आश्रत गदादे, शरद इथापे, शिक्षक नेते संभाजी फराटे, वाकडे केंद्रप्रमुख घुमरे, तांदळी सोसायटी अध्यक्ष शंकर गदादे आदी उपस्थित होते.
अधिकाºयांकडून सत्कार
गदादे आजींनी शाळेला विनामूल्य ६ गुंठे जमिनीचे बक्षिसपत्र करून दिल्याबद्दल शिरूरचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी अंजनाबाई पोपटराव गदादे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. तहसीलदार रणजित भोसले यांनीदेखील आजींनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाचे कौतुक केले.