भोरमधील ४२ मालमत्ताधारकांचा जागेचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:13+5:302021-05-22T04:10:13+5:30

प्रश्नाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री बाळासो थोरात यांनी एच ...

The land issue of 42 property owners in Bhor has been resolved | भोरमधील ४२ मालमत्ताधारकांचा जागेचा प्रश्न मार्गी

भोरमधील ४२ मालमत्ताधारकांचा जागेचा प्रश्न मार्गी

Next

प्रश्नाबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री बाळासो थोरात यांनी एच सत्ताप्रकारातील रेडीरेकनरच्या १५ टक्के निवासी वापरासाठी तर ५० टक्के वाणिज्य वापरासाठी तत्वत: मान्यता देऊन जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले आहेत. यामुळे अनेक वर्षे प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नवीआळीतील मालमत्ताधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान भोर शहरातील नवी आळी येथील नवीन वसाहत निर्माण करण्याकामी तत्कालीन पंतसचिव श्रीमंत रघूनाथराव पंतसचिव यांनी विविध जाती धर्माच्या गरीब वर्गाला निरंतर भाडेपट्ट्याने ४२ मालमत्ता फक्त र्इमला वापर करणेकरीता दिल्या होत्या. ही जागा या परिसरामधील मालमत्ताधारक गेली ७० ते ८० वर्षे भाडेकराराने वापरत असल्यामुळे सदर जागेचा उपभोग घेताना नगरपालिकेच्या बांधकाम नकाशा मंजुरी तसेच बँकाकडून अर्थसाहाय्य मिळवणे, वारसनोंद दाखल करणे संदर्भात अडचणी निर्माण होत होत्या.

जिल्हाधिकारी पुणे यांचे कडील बैठक १८/०८/२०२० च्या आदेशानुसार सदर मालमत्तेमध्ये बांधकाम परवाना व आर्थिक साहाय तसेच वारसनोंद करणे संदर्भात आमदार संग्राम थोपटे यांचे विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला तरीसुध्दा सचिन हर्णसकर गटनेते भोर न. पा. नितीन इंजरकर, सतिश रोमन, नीलेश कुंभार, अशोक जाधव, उत्तम शिंदे, रमेश म्हसवडे, संजय खोकळे इतर नवीआळीमधील सर्व मालमत्ता जमिनीधारक यांनी आमदार संग्राम थोपटे यांचेकडे एच सत्ताप्रकार हा भोगवटाधारक वर्ग २ मध्ये मोडत असून सदर जागेचा मालकी हक्क सरकारीचीच राहत आहे. त्यामुळे जमिनीचा एच सत्ता प्रकार हा भोगवटाधारक जमिनीचे मालकसदरी नोंद व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार आमदार संग्राम थोपटे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे पाठपुरावा करून २०/०५ /२०२१ रोजी बैठकीचे नियोजन करण्यात आले. सदर बैठकीमध्ये महसूल मत्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मागणीनुसार भोर नगरपालिका हद्दीतील नवीआळी येथील मालमत्ताधारक यांच्या संदर्भातील सत्ता प्रकार एच संदर्भातील आदेश रेडीरेकनरच्या १५% निवासी वापराकरीता व ५०% वाणिज्य वापराकरीता तत्वता मान्यता देवून सदर प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांना आदेश करण्यात आले आहेत. यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला ४२ मालमत्ताधारकांचा प्रश्न आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाने मार्गी लावल्याचे भोर नगरपलिकेतील काँग्रेसचे गटनेते व स्थानिक नगरसेवक सचिन हर्णसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

--

भोर शहरातील नवीआळी येथील ४२ मालमत्ताधारकांचा एच सत्ताप्रकाराचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबीत होता त्यामुळे सदर मालमत्ताधारकांना बँकाकडून कर्ज मिळत नव्हते, वारसनोंद होत नव्हत्या अशा अनेक अडचणी येत होत्या. मात्र महसूलमंत्री बाळासो थोरात यांच्याकडे पाठपुरावा करून सदरचा प्रश्न कायमचा मार्गी लावला आहे.

- संग्राम थोपटे (आमदार, भोर विधानसभा)

Web Title: The land issue of 42 property owners in Bhor has been resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.