भुयारी मार्ग रोगांचे माहेरघर

By admin | Published: October 17, 2015 01:12 AM2015-10-17T01:12:47+5:302015-10-17T01:12:47+5:30

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरात निर्माण केलेल्या सुविधांचा योग्य उपयोग होत नसेल, तर त्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करत आहेत.

Land of Pathological Pathways | भुयारी मार्ग रोगांचे माहेरघर

भुयारी मार्ग रोगांचे माहेरघर

Next

चंदननगर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरात निर्माण केलेल्या सुविधांचा योग्य उपयोग होत नसेल, तर त्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करत आहेत. यासाठी त्यांच्याकडून नगर रस्त्यावरील दोन भुयारी मार्गाचे उदाहरण दिले जात आहे. त्यात विमाननगर चौक, चंदननगरचा समावेश आहे.
विमाननगर चौकातील कोंडी बघता पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला; पण नागरिक याचा वापर करताना दिसत नाहीत. कारण, येथे विविध प्रकारच्या समस्या दिसून येतात. या मार्गावरील पायऱ्या व मार्गातील परिसरातील टवाळखोर उपद्रव करत बसतात; तसेच भुयारी मार्ग मद्यपींसाठी बारच बनला आहे. रात्रीच्या वेळी सर्रास पार्ट्या होत असल्याचे मार्गातील कचरा व मद्याच्या बाटल्यांवरून समजते.
दरम्यान, या मार्गावरून येणाऱ्या महिला-तरुणींची छेडछाड करत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत; तसेच भुयारी मार्गात ठिकठिकाणी चेंबर्स ठेवण्यात आल्याने ते चेंबर सांडपाण्याने तुडुंब भरून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी व पावसाचे पाणी हे याच ठिकाणी साचून दुर्गंधी निर्माण होत आहे. येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिक या मार्गाचा वापर टाळत नेहमीच्या मार्गाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.
नगर रस्त्यावरील दुसरा भुयारी मार्ग चंदननगर येथे उभारण्यात आला आहे. या ठिकाणी चंदननगर मुख्य बाजारपेठ व एअरफोर्स शाळा असल्या कारणाने हा मार्ग उभारण्यात आला. या मार्गाचा वापर मुख्यत: शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक करतात; मात्र मार्गात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले भुयारी मार्ग सुस्थितीत आणून नागरिकांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Land of Pathological Pathways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.