यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 09:22 PM2018-07-05T21:22:24+5:302018-07-05T21:22:55+5:30

जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुनर्जीवित होऊ शकेल...

The land of Yashwant sugar factory is 2.5 crore | यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

यशवंत साखर कारखान्याची जमीन अडीच कोटींची

googlenewsNext
ठळक मुद्देपुनरुज्जीवन अहवाल : कारखान्याकडे आहे २४८ एकरचा भूखंड

पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवन पाहणी अहवालात कारखान्याच्या तब्बल अडीचशे एकर जमिनीची पुस्तकी किंमत अवघी दोन कोटी ५१ लाख रुपये दाखविण्यात आले आहे. विशेष लेखापरिक्षकाने केलेल्या पाहणीत केवळ १२१ एकर जमिनीचे बाजार मूल्य अडीचशे कोटी रुपये दाखविले आहे. जमिनीची बाजारभावाने मिळणारी किंमत धरल्यास कारखान्याला कर्ज मिळणे शक्य होईल. त्यामुळे कारखाना पुरुज्जीवीत होऊ शकेल अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.  
शहराच्या हद्दी पासुन दहा किलोमीटरवर ३५०० टन ऊसाची गाळप क्षमता असलेल्या या साखर कारखान्याची उभारणी १९६६ साली वीस हजार शेतकºयांनी केली. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊसाचे देणे दिले नाही म्हणुन सरकारने एप्रिल २०११ रोजी कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. ताबा घेतेवेळी यशवंतवर राज्य सहकारी बँकेचे १८ कोटी रुपये कर्ज होते व त्या पोटी २४८ एकर जमीन तसेच कारखाना व डिस्टलरी तारण होते.
कारखाना ताब्यात घेतल्यानंतर तो सुरु करण्यात सरकार अपयशी ठरले. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१७ रोजी कारखाना अंतरीम अवसायनात काढला. त्यास शेतकºयांनी हरकत घेत, लोक वर्गणीतून कारखाना चालविण्याची तयारी दर्शविली. त्यानंतरही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी यशवंत कारखाना कायम स्वरुपी अवसायनात काढण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्या पुर्वी २ नोव्हेंबरला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मुंबईत मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. 
बंद पडलेले सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरु व्हावे या करीता मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला अहवाल सादर करण्यास सांगितले. त्यात २४८ एकर जमिनीचे मूल्य अडीच कोटी दाखविले आहे. कारखान्याचे नकत मूल्य उणे ११९ कोटी रुपये दाखविण्यात आले, तसेच संचित तोटा १३८ कोटी दाखविण्यात आला. कारखाना २०११ मधे बंद पडला. त्यावेळी मुल्य उणे ३१ कोटी तसेच संचित तोटा ५० कोटी होता व शासनाने कब्जा केल्यावर मूल्यात तसेच तोटा वाढल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे म्हणाले. राज्य सहकारी बँकेला व्याजासह २८ कोटी रुपयांचे देणे आहे. मात्र, त्यांनी ३०० कोटी रुपयांची जमीन ताब्यात घेतली आहे. त्यांनी त्यांचे कर्ज वसूल करण्याइतकी जमीन विक्री करणे अपेक्षित असल्याचे पांडे म्हणाले. 
......................
संस्था अवसायानात काढताना तिच्या स्थावर मालमत्तेचे बाजारभावानुसारचे मूल्य ग्राह्य धरले पाहीजे. तसे झाले असते तर यशवंत कारखान्याचे नक्त मूल्य वाढले असते. त्यामुळे कारखाना पुनरुज्जीवीत करणे शक्य झाले असते. कारखान्याच्या १२१ एकरची किंमत बाजारभावानुसार अडीचश्े कोटी रुपये होत असेल तर अडीचशे एकरनुसार कारखान्याचे मूल्य आणखी वाढेल. 
योगेश पांडे, प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना


 

Web Title: The land of Yashwant sugar factory is 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.