पौडरोड परिसरात लँडलाईन बंद : मेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:18 PM2018-09-14T14:18:28+5:302018-09-14T14:22:17+5:30

 पुणे मेट्रोच्या कामामुळे  शहरातील पौड रस्ता भागातील  बीएसएनएलच्या केबल तुटल्या असून त्यामुळे हजारो लँडलाईन फोनची सेवा बंद पडली आहे.

Landline phone service stop at Pune : BSNL cable breaks due to Metro work | पौडरोड परिसरात लँडलाईन बंद : मेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या

पौडरोड परिसरात लँडलाईन बंद : मेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या

Next
ठळक मुद्दे5 कोटींचं नुकसान झाल्याचा बीएसएनएलचा दावामेट्रो कामामुळे बीएसएनएलच्या केबल तुटल्या

पुणेपुणेमेट्रोच्या कामामुळे  शहरातील पौड रस्ता भागातील  बीएसएनएलच्या केबल तुटल्या असून त्यामुळे हजारो लँडलाईन फोनची सेवा बंद पडली आहे. त्यामुळे  या भागातील सुमारे तीन हजार फोन बंद आहेत. 

    पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे. विशेषतः वनाज ते रामवाडी मार्गावर खांबही उभे करण्यात आले आहेत. यातील बहुतांश मेट्रो स्टेशन्स जमिनीखाली असून त्यांचेही काम सुरु होण्याच्या मार्गावर आहे. हेच काम सुरु असताना परिसरातील जमिनीखालील केबल तुटल्या असून त्यामुळे तीन हजार फोन बंद पडले आहेत.ही सेवा पुर्वव्रत कारण्यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लागणार आहे. यात बीएसएनएल सेवेचे पाच कोटींचे नुकसान झाले आहे. 

(अधिक माहिती थोड्याच वेळात)

Web Title: Landline phone service stop at Pune : BSNL cable breaks due to Metro work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.