भाडेकरू म्हणून आले अन् घरमालक समजू लागले (डमी 888)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:56+5:302021-07-08T04:09:56+5:30

अनेक घरांचे मालक हे ज्येष्ठ नागरिक असल्याने ते भांडकुदळ भाडेकरूंचा सामना करू शकत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांनी मालकांना भाडे ...

The landlord came to understand as a tenant (dummy 888) | भाडेकरू म्हणून आले अन् घरमालक समजू लागले (डमी 888)

भाडेकरू म्हणून आले अन् घरमालक समजू लागले (डमी 888)

Next

अनेक घरांचे मालक हे ज्येष्ठ नागरिक असल्याने ते भांडकुदळ भाडेकरूंचा सामना करू शकत नाही. लॉकडाऊनमुळे अनेकांनी मालकांना भाडे वेळेवर दिलेले नाही. ते मागण्यासाठी गेलेल्या मालकांना अनेकदा अरेरावीचा सामना करावा लागतो. चार भिंतीच्या आतील दोघांची ही भांडणं आता पोलीस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत.

--------

माझ्या वारजेच्या सदनिकेचे भाडे वेळेवर देत नसल्याने त्यांच्याकडे विचारणा केली असता आता ते भांडणावर उतरले आहेत. आम्ही भाडे देणार नाही जे करायचे ते करा, अशी त्यांची भाषा सुरू झाल्याने नाईलाजाने पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली- विपुल देशमाने (नाव बदललेले)

----------

भाडेकरूंंचे खूप जुने करार असतात. उदा : वाड्यामधील घरांमध्ये अनेक वर्षांपासून जुने भाडेकरू राहतात. मालकाला वाडा डेव्हलप करायचा असतो तेव्हा बिल्डर आपल्याला वन बीएचके देईल अशी भाडेकरूंची अपेक्षा असते. विशिष्ट दुकानांबाबत दुकानदार आणि नवीन भाडेकरू यांचे अंतर्गत ट्रान्झॅक्शन होतात आणि मालक बाजूला राहतात. ॲड. शिवाजी प्र. कदम-जहागीरदार, विधिज्ञ

------------

अनेक प्रकरणे न्यायालयात...

-भाडे वेळेवर न देणे, घर खाली न करणे, भाडे मागण्यासाठी गेल्यावर मालकाला शिवीगाळ करणे, भांडणे

-जागा बळकावण्यासाठी भूमाफियांचा वापर किंवा हस्तक्षेप

--------------

घर भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी?

* भाडेकरार करताना सर्व गोष्टी आधीच नमूद कराव्यात.

* समोरच्या व्यक्तीच्या ओळखीचा फोटो आयडी देखील आपल्याकडे असावा.

* भाडेकरूंची नोंद पोलीस स्टेशनकडे करणे आवश्यक आहे.

------

Web Title: The landlord came to understand as a tenant (dummy 888)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.