जमीनमालकाला गोळ्या घालण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:09 AM2021-04-15T04:09:46+5:302021-04-15T04:09:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मालकाने जमीन खरेदीखतामधील उर्वरित रक्कम मागितल्याचा राग मनात धरून गोळ्या घालण्याची धमकी देत २० ...

Landlord threatened to shoot | जमीनमालकाला गोळ्या घालण्याची धमकी

जमीनमालकाला गोळ्या घालण्याची धमकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मालकाने जमीन खरेदीखतामधील उर्वरित रक्कम मागितल्याचा राग मनात धरून गोळ्या घालण्याची धमकी देत २० लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या बुधवार पेठेतील बड्या सराफी व्यावसायिकासह चार जणांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. हा प्रकार मे २०१६ ते एप्रिल २०२१ दरम्यान घडला आहे.

सराफी व्यावसयिक गौतम जयंतीलाल सोळंकी आणि रणधीर जयंतीलाल सोळंकी यांच्यासह दिलीप साहेबराव यादव, सुमीत प्रकाश साप्ते आणि सागर दत्तात्रय मुजुमले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रणधीर सोळंकीसह तिघांना अट्क केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भोर तालुक्यातील ससेवाडीचे रहिवाशी आहेत. त्यांनी २०१६ मध्ये वडिलोपार्जित जमीन विक्रीचा व्यवहार आरोपींबरोबर केला होता. त्यांनी आपली जमीन ९३ लाख रूपयांना विकली होती. त्यापैकी ३२ लाख ५० हजार रूपयांची रक्कम आरोपींनी त्यांना दिली होती. उ

र्वरित ६० लाख २५ हजार रूपयांची रक्कम फिर्यादी सोळंकी यांच्या दुकानात गेले असता त्यांनी चेक देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हे मध्यस्थी असलेल्या दिलीप यादव यांच्या कार्यालयात गेले. मात्र यादव आणि साप्ते यांनी त्यांच्या कमरेला असलेले रिव्हॉल्व्हर त्यांच्या अंगावर रोखले आणि २० लाख रूपये दिल्याशिवाय चेक देणार नाही. काय करायच ते कर. पुन्हा आला तर गोळ्या घालीन आणि पोलिसांमध्ये गेलास तर याद राख अशी धमकी त्यांनी फिर्यादी यांना दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. या अर्जाची खातरजमा करून त्यांच्या ऑफिस व घरावर छापा टाकून चार जणांना अटक केली आहे.

छापादरम्यान शंभरहून अधिक मूळ खरेदीखत, साठेखत, विसारपावती, संमतीपत्र, करारनामे, एमओयू मिळाले आहेत. यात सही केलेले ब्लँक चेकबुक व चेक, सही केलेले मुद्रांक, दोन आलिशान गाड्या अणि दोन रिव्हॉल्व्हर जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास विरोधी पथकाचे खंडणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.

Web Title: Landlord threatened to shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.