साळुंगण येथे भूस्खलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:15+5:302021-07-24T04:09:15+5:30
लोकतम न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सांळुगण येथील डोंगराचा कडा खाली काेसळला. जवळपास ...
लोकतम न्यूज नेटवर्क
भोर : तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सांळुगण येथील डोंगराचा कडा खाली काेसळला. जवळपास ३०० फुट झाडे झुडपे दगडमाती खाली येऊन डोंगराखलील स्मशानभूमीवर पडल्याने ती गाडली गेली. तर दरडी व पाण्यामुळे भोर पांगारी धारमंडप मार्गे महाड रोडला येणारा रस्ता बंद झाला. यामुळे अनेक गावांचा संर्पक तुटला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
साळुंगण येथील भूस्खलन झालेल्या भागाची व शेतीच्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी गटविकास अधिकारी
विशाल तनपुरे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे सभापती दमयती जाधव, विस्तार आधिकारी रामेश्वर राठोड, अनिल मदने, राजेंद्र चांदगुडे, सरपंच राजेश रांजणे, उपसरपंच आनंदा दुरकर, निलेश फंड, अभिषेक बोत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मागिल दोन तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे साळुंगण गावातील डोगरावरुन आलेल्या पाण्यामुळे सुमारे ३०० फुटावरुन दगड माती झाडे दरडी वाहुन आल्याने डोगराखाली असलेली स्मशानभुमी वाहुन गेली. दगड, माती पाण्यामुळे भोर पांगारी धारमंडप महाड मार्गावरील वाहातुक बंद आहे. पाऊस कमी झाल्याशिवाय रस्ता सुरु होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे धारमंडप बाजुकडुन संर्पक तुटलेला आहे. यामुळे साळुंगण, राजिवडी, कुंड, आशिंपी उंबार्डे या गावांचा तर महाड व साळुंगण दोन्ही बाजुकडुन रस्ताच बंद झाल्याने संर्पक तुटलेला आहे. सांळुगण गावात दोन ठिकाणी दरडी पडुन शेतीचे मोठे नुकसान झाले. गावातील हौसाबाई गायकवाड या वयोवृध्द आजीची संपुर्ण भातशेती खराब झाली असुन भविष्यात दुरुस्त होईल की नाही शासन काय मदत देणार कि नाही या विचाराने तिच्या डोळयात अश्रू आणावर झाले होते.
साळुंगण गावात भूस्खलन होऊन डोंगरातील दगडमाती खाली येऊन स्मशानभूमी गाडली भातशेती पाण्यात गेली तर रस्ताही बंद झाला आहे. र नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी सांगितले. सांळुगण येथील दरड पडल्याने स्मशानभुमी गाडली आहे येथील रस्ता वाहातुकीस खुला करुन देण्यासह शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील माञ पाऊस पडत आहे यामुळे सदर भागात लोकांनी जाऊ नये असे आवाहन भोर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी विशाल तनपुरे यांनी केले.
फोटो साळुंगण ता भोर येथे दरड पडुन नुकसान पाहणी करताना गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, सदस्य विठ्ठल आवाळे, सभापती दमयंती जाधव