लोणावळा पोलिसांची दोन महिन्यात 925 वाहनांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 04:37 PM2017-07-31T16:37:31+5:302017-07-31T16:39:29+5:30

लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे.

laonaavalaa-paolaisaancai-daona-mahainayaata-925-vaahanaanvara-kaaravaai | लोणावळा पोलिसांची दोन महिन्यात 925 वाहनांवर कारवाई

लोणावळा पोलिसांची दोन महिन्यात 925 वाहनांवर कारवाई

Next
ठळक मुद्देलोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे. विना हेल्मेट वाहनं चालविणार्‍यांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसुल केला आहे.

लोणावळा, दि. 31-  लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली आहे. यामध्ये विना हेल्मेट वाहनं चालविणार्‍यांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसुल केला आहे.
अवैध प्रवासी वाहतुक करणार्‍या 46 वाहनांवर कारवाई करत 50 हजार दंड वसूली, विना परवाना वाहन चालविणार्‍या 39 वाहनांवर कारवाई करत 20 हजार 400 रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणार्‍या 177 वाहनांवर कारवाई करत 36 हजार 200 रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे 125 वाहनांवर कारवाई व 25 हजार 400 रुपये दंड, मोबाईल वर बोलत वाहन चालविणारे 11 जणांवर कारवाई करत 2200 रुपये दंड, फँन्सी नंबर प्लेट असणार्‍या 16 वाहनांवर कारवाई व 4 हजार 700 रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणार्‍या 184 वाहनांवर कारवाई करत 45 हजार 700 रुपये दंड तर दारु पिऊन वाहन चालविणार्‍या तब्बल 40 जणांवर खटले दाखल करण्यात आले.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनिल मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनिस दर्शन गुरव, सतिष ओव्हाळ, अंकूश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली

Web Title: laonaavalaa-paolaisaancai-daona-mahainayaata-925-vaahanaanvara-kaaravaai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.