लोणावळ्यात शिवसेनेची आबु आझमी व वारिस पठाणच्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:53 PM2017-07-30T12:53:43+5:302017-07-30T12:53:46+5:30
भारतात राहून वंदे मातरम म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबु आझमी व एम आई एम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात लोणावळा शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
लोणावळा, दि. 30 : भारतात राहून वंदे मातरम म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबु आझमी व एम आई एम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात लोणावळा शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
आझमी व पठाण हे दोन्ही नेते भारतात राहून कायम भारतीय संविधानाच्या विरोधात भुमिका घेतात. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाण म्हणणार नाही असे जाहीर करुन ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे मातरण म्हण्याची ज्यांना लाज वाटते त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शिवसैनिकांनी यावेळी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख बबन अनसुरकर, उपशहरप्रमुख मारुती खोले, संजय घोंगे, सुनील इंगुळकर, शामबाबु वाल्मिकी, हेमंत मेणे, युवा सेनेचे अजय ढम, यशोधन शिंगरे, नरेश काळवीट, एकनाथ जांभुळकर, सूर्यकांत ढाकोळ, उल्हास भांगरे, नरेश घोलप, अविनाश शिंदे, विशाल गोणते, यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.