मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:14 PM2019-03-28T18:14:59+5:302019-03-28T18:17:02+5:30

गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली.

Laraman Jagtap of Shrirang Barane for the meeting | मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

मनोमिलनासाठी श्रीरंग बारणे यांचे लक्ष्मण जगताप यांच्यापुढे लोटांगण

googlenewsNext
ठळक मुद्देसचिन पटवर्धन यांची शिष्टाई : जगताप यांच्या चंद्रागण बंगल्यावर एक तास चर्चा

पिंपरी : गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे मावळ लोकसभा मतदार सघातील शिवसेना युतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट आज झाली.
 राज्यलोकलेखा समितीचे अध्यक्ष अड. सचिन पटवर्धन यांच्या शिष्टाईने पिंपळेगुरव येथील जगताप यांच्या निवासस्थांनी समेट घडवियात आला. मनोमिलनाला बारणे यांनी जगताप यांना लोटांगण घातल्याची चर्चा आहे.मावळ लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात आमदार जगताप सहभागी झाले नव्हते. उलट जगताप यांच्यासह समर्थक नगरसेवकांच्या बैठकीत बारणे यांच्या उमेदवारीला विरोध करीत मतदारसंघावर भाजपाने दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुरू असूनही अपयश मिळत होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर पटवर्धन यांनी केलेली शिष्टाई कामी आली.केलेली 

एकेकाळचे चांगले मित्र असलेल्या बारणे आणि जगताप यांच्यात २००९ पासून दुरावा निमाण झाला होता.  मात्र,  युती धर्माचे पालन करू असे जगताप यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसांपूर्वी सागितले होते. मात्र, बारणे यांनी स्वतः माझ्याकडे येऊन माफी मागण्याची त्यांची अट होती.  त्यानुसार पटवर्धन यांच्या पुढाकाराने बारणे यांनी जगताप यांच्या निवासस्थानी आज भेट घेतली. एक तास चर्चा झाली, मात्र गुप्त बैठक असल्याचे सांगत माहिती देण्यास नकार देण्यात आला.
.....---
दोघापुढेही दिलजमाईशिवाय नव्हता पर्याय...
 लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा दोघे समोरा-समोर आले होते.  बारणे यांनी शिवसेना-भाजप तर  जगताप यांनी शेकाप-मनसेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविली होती. त्यात बारणे यांनी जगताप यांचा पराभव केला होता. आता बारणे शिवसेनेत तर जगताप भाजपमध्ये आहेत. दोन्ही पक्षाची लोकसभा निवडणुकीला युती झाली आहे. भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी केली. परंतु, युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिला. त्यामुळे दोघापुढेही दिलजमाई शिवाय पर्याय नव्हता.

Web Title: Laraman Jagtap of Shrirang Barane for the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.