लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:47+5:302021-09-13T04:10:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात सध्या कोरोना आणि बालकांचे लसीकरण मोहीम सुरू आहे. कोराेना लसीकरणासाठी केंद्र ...

Large needle for vaccine; Run away from the waste! | लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात सध्या कोरोना आणि बालकांचे लसीकरण मोहीम सुरू आहे. कोराेना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सीरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बालकांच्या लसीकरणासाठी दोन सीसी सीरिंज वापरण्यात येत असल्याने लसीचे वेस्टेज वाढत असल्याचे दिसून येत आहे. एडी सुईचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागासमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुरवठा कमी होत असल्याने स्थानिक पातळीवर खरेदीचे आदेश दिले आहेत. रोज होणाऱ्या लसीकरणात या इंजेक्शनच्या वापरामुळे जवळपास १० टक्के लस रोज वेस्टेज होत आहे.

जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. शनिवारी जवळपास ९० लाख नागरिकांचे लसीकरण झाले. राज्यस्तरावरून लसीचा मुबलक पुरवठा होत असल्याने लाभार्थ्यांचा आकडा वाढला आहे; परंतु हे लसीकरण करण्यासाठी एडी सुईचा वापर केला जातो. ही सुई केंद्र शासनाने दिली आहे. सध्या या सुईचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरणासाठी साधारण नियमित वापरली जाणारी दोन सीसीची सुई वापरली जात आहे. लसींचा तुटवडा जरी असला सध्या तरी त्या पुरत आहेत; मात्र मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांचा हमखास तुटवडा जाणवत आहे.

जिल्ह्यात रोज दीड लाखांच्या आसपास लसीकरण होत आहे. त्यामुळे राेज दीड लाख सीरिंज जिल्ह्याला लागतात.

चौकट

काय आहे एडी, २ सीसी सीरिंज

एडी सीरिंज म्हणजे ॲटो डिसेबल. ०.५ मि.ली.ची ही सुई एकदा वापरली की, पुन्हा वापरता येत नाही. ही सुई आपोपाप लॉक होते. या सुईतून लस वेस्टेज होत नाही, तर २ सीसी ही सुई नियमितच्या इंजेक्शनची असते. त्यामुळे डोस वाया जातो. ती डिस्पोजेबल आहे.

चौकट

दररोज दीड लाख सुईंची गरज

जिल्ह्यात दररोज सरासरी किमान दीड ते १ लाख ७५ हजारांच्या दरम्यान लसीकरण होत आहे. त्यामुळे रोज किमान दीड लाख सुईंची आवश्यकता लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून त्या लवकरात लवकर आरोग्य विभागाकडे आणि तिथून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडे त्या सुईंचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे.

चौकट

वेस्टेज वाढले

जिल्ह्यात रोज होणाऱ्या लसीकरणात या प्रकरच्या सीरिंजमुळे १० टक्के लस ही वेस्टेज होत आहे. एडी सुईचा तुटवडा असल्याने स्थानिक पातळीवर दोन सीसी सुईची खरेदी करण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार आहे.

कोट -

केंद्र शासनाकडून पुरवठा कमी होत असल्याने एडी सुईचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी स्थानिक पातळीवर खरेदीचे आदेश आम्हाला दिले आहेत. त्यानुसार या सुया खरेदी केल्या जात आहेत.

- डॉ. सचिन येडके, जिल्हा लसीकरण अधिकारी

Web Title: Large needle for vaccine; Run away from the waste!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.