ओतूर शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या प्रोत्साहनामुळे लसीकरणास मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:30+5:302021-05-06T04:09:30+5:30
यासाठी ओतूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर, कार्याध्यक्ष विलास सुतार, सचिव रामदास डुंबरे, सहसचिव दिलीप घोलप, ...
यासाठी ओतूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर, कार्याध्यक्ष विलास सुतार, सचिव रामदास डुंबरे, सहसचिव दिलीप घोलप, कोषाध्यक्ष अशोक सहाणे, उपाध्यक्ष प्रतापराव हांडे देशमुख, सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार यांच्याशी विचार विनिमय करून लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठांना प्रबोधन करण्यासाठी अनुमती घेतली व लसीकरण करण्यासाठी ज्येष्ठांना मदत करणे सुरू केले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव दिलीप धोंडीभाऊ घोलप व सदस्य दत्तात्रय शंकर डुंबरे हे दोघेही लसीकरण करण्यास प्रारंभ झाला, तेव्हापासून दोघेही सकाळी ७ वाजेपासून संध्याकाळी लसीकरण संपेपर्यंत हजर असतात. लसीकरण करण्यासाठी नंबर लावणे, अतिवृद्ध असतील त्यांना व अपंगांना स्वतःच्या पाठीवर घेऊन लसीकरण करून घेत आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मंडप घातला आहे. बसण्यासाठी खुर्ची व्यवस्था केली आहे. त्यांना ओतूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी भास्कर डोके, अनिल लेंडे, बाळासाहेब एलमार, सुरेश तांबे हे सहकार्य करीत आहेत. ज्येष्ठांना गरजेनुसार अल्पोपहार दिला जात आहे. ओतूर शहरात २ मेपर्यंत १३ हजार ३६७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात पुरुष ७ हजार २९८ व महिला ६ हजार ६९ यांचे लसीकरण झाले आहे. कोविशिल्डचे११ हजार ७८३ व कोवॅक्सीन १ हजार ५४८ जणांना लसीचे डोस देण्यात आले.
४ हजार ९६१ पहिला डोस घेतला. यापैकी ५४४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षांवरील ४ हजार ५३७ पहिला डोस, तर यापैकी १४८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. आरोग्य कर्मचारी २११ पैकी १२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंट लाईन कर्मचारी ७७७ पैकी १३६ जणांनी मधुमेह रक्तदाब असणाऱ्या ३०९ डोस पहिला डोस, १० हजार ७९५ यातील ९८८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण भागात लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
१ मेपासून वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील युवक-युवतीसाठी लसीकरण सुरू झाले आहे; परंतु तालुक्यात फक्त ओतूर प्राथमिक केंद्र येथेच आहे. त्यामुळे खूपच गर्दी होते आहे. या वेळी ओतूर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतुरकर, उपाध्यक्ष प्रताप हांडे, कार्याध्यक्ष विलासराव सुतार, कोषाध्यक्ष अशोक सहाणे, सचिव रामदास डुंबरे उपस्थित होते.
लसीकरण करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी खुर्ची व्यवस्थापन ओतूर ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरिक संघाने केले.