पाणीटंचाईचे मोठे सावट, तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:25 AM2018-10-05T01:25:10+5:302018-10-05T01:25:25+5:30

पावसाची पाठ : पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यातील अनेक तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

Large water turbines, lakes and bunds dry dry | पाणीटंचाईचे मोठे सावट, तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

पाणीटंचाईचे मोठे सावट, तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

Next

नीरा : कायम दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा परतीच्या पावसातही हुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली दोन वर्षे सतत दुष्काळ पडल्याने बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, वाल्हा गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडी, नव्या निर्माण झालेल्या सुकलवाडी, वाघदरवाडीसह वाड्या-वस्त्यांवर सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. ऐन हंगामात विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकºयांसमोर पुढील काळात भेडसावणाºया टंचाईसदृश परिस्थितीचे चित्र उभे राहिले आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी काढणी सुरू आहे. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभºयाची पेरणी करावी की नाही असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पावसाच्या आशेवर काही शेतकºयांनी कांदालागण केली आहे. पण अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.
पावसाळ्यापूर्वी वळवाच्या पावसाने सुरुवात चांगली झाली होती. पण मॉन्सूनच्या पावसाने पाठ फिरवली व नंतर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गतवर्षी पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यात सरासरीच्या तुलनेत साठ टक्के पाऊस झाला होता. त्याचा परिणाम जानेवारीलाच जाणवू लागला होता. तशीच काही परिस्थिती आजच जाणवत आहे. वाल्हे गावच्या पूर्वेकडील रेल्वे लाईन जवळचे तळे, राख येथील फांज ओढ्यावरील बंधारा, ब्रिटिशकालीन तलाव,नावळी खिंडीतील एकाही तलावात पाणी दिसत नाही.

लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा
सुकलवाडी गावात यावर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम झाले आहे. पण पाऊसच पडला नसल्याने सीसीटी बंधाºयात पाणी जमा झाले नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच दुष्काळ जाहीर करावा.
- धनंजय पवार, उपसरपंच, सुकलवाडी

Web Title: Large water turbines, lakes and bunds dry dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे