पुण्यातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला खराडीत सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:08 AM2021-06-06T04:08:02+5:302021-06-06T04:08:02+5:30
पुणे : कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांची मदत लाभली, तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढून ही लढाई सोपी ...
पुणे : कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी यंत्रणांना स्वयंसेवी संस्थांची मदत लाभली, तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढून ही लढाई सोपी होऊ शकते. कोरोनाच्या काळात स्वयंसेवी संस्थांनी अनेक पद्धतीने योगदान दिले. याला अनुसरून कोरोना विरुद्धची ही लढाई आपल्या सर्वांची आहे, या भावनेतून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी सुरेंद्र पठारे फाउंडेशनने ‘लसीकरण थेट आपल्या दारी’ ही मोहीम सुरू केली असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.
लसीकरण मोहिमेचे उद्घाटन माजी आमदार बापू पठारे यांच्याहस्ते फॉरेस्ट कौंटी सोसायटीतून करण्यात आले. यावेळी सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
पठारे म्हणाले की, नागरिक आणि लसीकरण यंत्रणा यांची वेगवान लसीकरणासाठी सांगड घालून देण्याचे काम स्वयंसेवी संस्था करू शकतात. हा विचार करून फाउंडेशनने पुढाकार घेत लसीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच संबंधित यंत्रणा यांच्यासोबत चर्चा केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लसीकरणाची परवानगी मिळवली. त्यानुसार खराडी आणि विमाननगर परिसरातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. शनिवारी फाउंडेशनच्या सहभागाने आणि डॉक्टर, परिचारिका यांच्या पथकाने खराडीतील १२ सोसायट्यांमधील चार हजार नागरिकांचे एका दिवसात लसीकरण केले. याप्रमाणे पुढील दहा दिवसांत १२२ सोसायट्यांमधील २५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
पुढे ते म्हणाले की, पुणे महानगरपालिकेने शहरात पहिली परवानगी फाउंडेशनला दिली आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग येणार आहे. एका दिवसात चार हजार नागरिकांचे लसीकरण करणे ही मोठी गोष्ट आहे.
फोटो मेल केला आहे.