आरटीई प्रवेशासाठी आज अखेरचा दिवस, सव्वा लाख जागांसाठी दोन लाख अर्ज; लॉटरी पद्धतीने प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:56 AM2018-03-07T02:56:48+5:302018-03-07T02:56:48+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दोन लाख अर्ज आले आहेत. राज्यभरातून १ लाख २६ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया पार पडत आहे. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर येत्या १२ व १३ मार्च रोजी आलेल्या सर्व अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातील.
पुणे - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी दोन लाख अर्ज आले आहेत. राज्यभरातून १ लाख २६ हजार जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया पार पडत आहे. आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर येत्या १२ व १३ मार्च रोजी आलेल्या सर्व अर्जांमधून लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जातील.
आरटीई प्रवेशासाठीच्या पहिल्या फेरीचे आॅनलाइन अर्ज भरण्यास १० फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिली तसेच शिशू वर्गाच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली, त्याचा बुधवार हा अखेरचा दिवस आहे. आरटीईच्या राखीव कोट्यांतर्गत राज्यभरात ९ हजार शाळांमधून १ लाख २६ हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी मंगळवारअखेरपर्यंत १ लाख ७५ हजार अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती प्राथमिक विभागाचे उपसंचालक शरद गोसावी यांनी दिली. संगणकाद्वारे लॉटरी काढून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी १३ मार्चपर्यंत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाईल. एकूण ३ ते ४ फेºया राबविल्या जाण्याची शक्यता आहे. ज्या पालकांना आरटीई प्रवेशासाठी पहिल्या फेरीत अर्ज करता आला नाही, त्यांना दुसºया फेरीत अर्ज करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रवेश मिळण्यास उशीर होऊ नये, यासाठी जानेवारी महिन्यापासूनच ही प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र,
इंग्रजी शाळांनी आरटीई
प्रवेशासाठी नावनोंदणी करण्यास विलंब केल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलावी लागली.
प्रवेशाची यादी १३ मार्च पर्यंत जाहीर होणार
1आरटीई प्रवेशासाठी १२ व १३ मार्च रोजी लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित केले जाणार आहेत. प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी १३ मार्चपर्यंत जाहीर केली जाईल.
2त्यानंतर त्या-त्या शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रवेशाची दुसरी फेरी राबविली जाईल.
3त्याचबरोबर पुढील फेºयांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्राथमिक शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाणार आहे.