शहरात अखेर चार नाईट शेल्टर सुरू

By admin | Published: November 25, 2014 11:43 PM2014-11-25T23:43:43+5:302014-11-25T23:43:43+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने अखेर शहरातील सेनादत्त, पुणो स्टेशन, बोपोडी व येरवडा भागात नाईट शेल्टर (रात्र निवारा) सुरू केले आहेत.

The last four night shelters in the city begin | शहरात अखेर चार नाईट शेल्टर सुरू

शहरात अखेर चार नाईट शेल्टर सुरू

Next
पुणो : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने अखेर शहरातील सेनादत्त, पुणो स्टेशन, बोपोडी व येरवडा भागात नाईट शेल्टर (रात्र निवारा) सुरू केले आहेत. चारही ठिकाणी मिळून 2क्क् जणांच्या निवा:याची क्षमता असून, सद्यस्थितीत सरासरी 9क् जणांना रात्र निवारा मिळत आहे. महापालिकेतच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयनिहाय नाईट शेल्टर उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती नागरवस्ती विकास विभागाचे संचालक हनुमंत नाझीरकर यांनी दिली. 
शहरातील रस्ते, बस व रेल्वे स्थानकांवर आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक जण झोपतात. त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने निवारा नसलेल्या व्यक्तींसाठी महापालिकांना नाईट शेल्टर उभारण्याचे आदेश दिले होते. मात्र, पुणो महापालिकेने त्याची अंमलबजावणी केली नाही. अखेर उच्च न्यायालयाने दोन वर्षापूर्वी महापालिका प्रशासनाला फटकारले होते. त्यानंतर शहरातील पुणो स्टेशन, शिवाजीनगर, स्वारगेट बस स्थानक, मंडई व मार्केट यार्ड या ठिकाणी शेल्टर उभारण्याचे प्रस्ताव आले. परंतु, काही ठिकाणी नगरसेवकांनी प्रभागात शेल्टर उभारण्यास नकार दिला. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शेल्टरचे प्रस्ताव रखडले होते. 
दरम्यान, महापालिका प्रशासनाने 2क्12-13 या काळात रात्री 9 ते पहाटे 3 या काळात रस्त्याच्या बाजूला आणि स्टेशनवर झोपणा:या नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्या वेळी महापालिकेच्या हद्दीत 851 जणांचा शोध लागला होता. बाहेरगावाहून आलेले नागरिक की ज्यांची आर्थिक क्षमता नाही, अशा नागरिकांची माहिती घेण्यात आली. 
संबंधितांना रात्र निवा:यासाठी महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रत्येकी एक शेल्टर उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवकांनी शेल्टर उभारण्यासाठी विरोध केल्याने ते बारगळले. 
अखेर एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने व नगरसेवकांना विश्वासात घेऊन चार ठिकाणी शेल्टर सुरू केले आहेत. विश्रमबाग व भवानी पेठेत आणखी दोन शेल्टर प्रस्तावित आहेत. नाईट शेल्टरसाठी नागरिकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी समुदेशन करण्यात येणार आहे. रात्र निवा:यासाठी येणारे नागरिक व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा करण्यात आलेली आहे, अशी माहिती नाझीरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
अशी आहेत..नाईट शेल्टर 
4सेनादत्त सांस्कृतिक भवन, (सेनादत्त पोलीस चौकीजवळ, राजेंद्रनगर)
4मोलेदिना पार्किग प्लाझा सभागृह (पुणो स्टेशन)
4दूधभट्टी येथील समाजमंदिर (बोपोडी)
4मदर तेरेसा समाजमंदिर (येरवडा)
प्रस्तावित नाईट शेल्टर..
4विश्रमबाग   
4भवानी पेठ

 

Web Title: The last four night shelters in the city begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.