पेरणी-लागवड अंतिम टप्प्यात : बाजरी, नाचणीचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:05 AM2018-08-18T00:05:52+5:302018-08-18T00:14:58+5:30

 In the last stage of sowing-plantation | पेरणी-लागवड अंतिम टप्प्यात : बाजरी, नाचणीचे क्षेत्र घटले

पेरणी-लागवड अंतिम टप्प्यात : बाजरी, नाचणीचे क्षेत्र घटले

Next

पुणे : खरिपाची पीक लागवड आणि पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, मका, उडीद, सोयाबीन पिकाने सरासरी क्षेत्र ओलांडले आहे. तर, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, तीळ आणि सूर्यफुलाच्या क्षेत्रात घट झाल्याचे दिसून येत आहे. तूर आणि मुगाची सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
राज्यात ऊस पीक वगळून खरिपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी १३०.११ लाख हेक्टरवरील (९२ टक्के)
पेरणी-लागवड उरकली आहे. राज्यात भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २१७ हेक्टर असून, १२ लाख ५० हजार ८७८ हेक्टरवरील (८३ टक्के) लागवडीची कामे झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२६ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र ७ लाख १९ हजार ३७८ हेक्टरवरुन ३ लाख १० हजार ९९९, बाजरीचे क्षेत्र ८ लाख १० हजार ४६७ हेक्टरवरुन
४ लाख ९३ हजार ३८ आणि नाचणीचे क्षेत्र १ लाख ८ हजार ९८६ वरुन ६४ हजार २२७ हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तिनही पिकांच्या सरासरी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. मक्याच्या सरासरी क्षेत्रात ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टरवरुन ७ लाख ७७ हजार ४४८ हेक्टरपर्यंत (१०६ टक्के) वाढ झाली आहे.

तुरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ हेक्टर असून, ११ लाख ९२ हजार ५७३ हेक्टरवर (९६ टक्के), मुगाची ३ लाख ९७ हजार ४५० हेक्टरपैकी ३ लाख ९० हजार ५६ हेक्टरवर (९८ टक्के) पेरणी झाली आहे.

उडीदाचे क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टरवरून ३ लाख ६२ हजार १७० हेक्टरपर्यंत (११४ टक्के) वाढले आहे. तीळाचे क्षेत्र ३० हजार ६५१ वरुन १२ हजार ८४१, कारळे २४ हजार ६८९ वरुन १० हजार १८७ आणि सूर्यफुलाचे क्षेत्र २७ हजार ९६३ वरुन अवघे ७ हजार २९४ हेक्टर पर्यंत आक्रसले आहे.

भूईमुगाचे क्षेत्रही २ लाख ३७ हजार ५४ हेक्टरवरुन १ लाख ७९ हजार ६८६ हेक्टरपर्यंत खाली आले आहे. सोयाबीन ३५ लाख ५३ हजारांवरुन ३८ लाख ६३ हजारआणि कापसाचे क्षेत्र ४१ लाख ९१ हजारावरुन ३९ लाख ९४ हजारांवर गेले आहे.

Web Title:  In the last stage of sowing-plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.