पुण्यात परवडणा-या घरांच्या संधीसाठी अखेरचे तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:09 AM2018-01-26T03:09:59+5:302018-01-26T03:10:12+5:30
सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
पुणे : सर्वसामान्य ग्राहकांसाठी परवडणाºया दरात घर उपलब्ध करून देणा-या ‘आपलं घर - संकल्प दिवस’ योजनेमध्ये हक्काचं घर बुक करण्यासाठी आता केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ही योजना २८ जानेवारी २०१८ रोजी संपेल. नव्या वर्षात ‘आपलं घर - संकल्प दिवस २०१८’ योजना सादर करून सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी ‘मेपल ग्रुप’चे व ‘आपलं घर’चे संस्थापक-संचालक सचिन अगरवाल यांनी संकल्प व्यक्त केला होता.
या योजनेला वर्षारंभापासून शेकडो ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या योजनेअंर्तगत ग्राहकांना केवळ ५ हजार ते १ लाख रुपये बुकिंगची रक्कम आपल्या सोयीनुसार भरून आपल्या घराची नोंदणी करता येणार आहे. सदर योजनेमधील ग्राहकांना ३ ते ५ लाखांपर्यंतची घसघशीत सूट तसेच २.६७ हजारांपर्यंतचे प्रधानमंत्री आवास योजनेतील अनुदान भारत सरकारकडून मिळणार आहे. या योजनेसंदर्भाने व ग्राहकांच्या प्रतिसादाबद्दल बोलताना सचिन अगरवाल म्हणाले, की ‘नव्या वर्षात सर्वसामान्यांच्या हक्काचं घर पूर्ण व्हावं, यासाठी मी केलेल्या संकल्पाची पूर्ती होताना दिसते आहे, याचा मला मनस्वी आनंद होतो. ग्राहकांनीदेखील नव्या वर्षात आपल्या हक्काच्या घरासाठी संकल्प करण्याचे आवाहन आम्ही केले होते. त्यालादेखील नागरिकांनी प्रतिसाद दिला व या योजनेत घरांची नोंदणी केली. त्यासाठी मी ग्राहकांचे मन:पूर्वक आभार मानतो. ‘‘मात्र, आतापर्यंत ज्यांना आपली परवडणाºया दरातील घरखरेदी करता आलेली नाही, अशा ग्राहकांसाठी अखेरच्या तीन दिवसांचीच संधी शिल्लक आहे. त्यांनी या संधीचा लाभ घेऊन घरांची नोंदणी करून संकल्पपूर्ती करावी, असे आवाहन मी यानिमित्ताने करतो. या योजनेद्वारे ‘आपलं घर’ने पुणे शहराच्या चारही दिशांना आवाक्यातील व रेरा नोंदणीकृत घरे उपलब्ध करून दिली आहेत. ज्यात वन बीएचके १० लाख ९० हजारांपासून, टू बीएचके १६ लाख ८० हजारांपासून सर्व खर्चासह उपलब्ध करून देण्यात आली आहेत.’’ २९ जानेवारीपासून ‘आपलं घर’च्या सर्व किमतींमध्ये वन बीएचकेमध्ये ३, तर टू बीचएकेमध्ये ५ लाखांपर्यंत वाढ होणार आहे. रेडी पझेशन फ्लॅट्स उपलब्ध आहेत. ‘आपलं घर’च्या सणसवाडी, रांजणगाव, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, किरकटवाडी, चाकण व लोहगाव या प्रकल्पांमध्ये रेडी पझेशन फ्लॅट्स उपलब्ध आहेत.