सरत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट २५ हून ७.५ टक्क्यांपर्यंत घटला, रिकव्हरी ९४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:27+5:302021-05-31T04:08:27+5:30

दिलासादायक चित्र : शहरातील लाट ओसरतेय लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील लाट झपाट्याने ओसरू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू ...

Last week, the positivity rate fell from 25 per cent to 7.5 per cent, while the recovery was 94 per cent. | सरत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट २५ हून ७.५ टक्क्यांपर्यंत घटला, रिकव्हरी ९४ टक्के

सरत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट २५ हून ७.५ टक्क्यांपर्यंत घटला, रिकव्हरी ९४ टक्के

Next

दिलासादायक चित्र : शहरातील लाट ओसरतेय

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील लाट झपाट्याने ओसरू लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला होता. पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट ७.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच शेवटच्या आठवड्यात रिकव्हरी रेटही ९४ टक्के वर गेला आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

काेरोनाची लाट मे महिन्यात ओसरू लागली आहे. दोन-अडीच महिन्यांच्या उद्रेकानंतर चिंता कमी करणारे चित्र निर्माण झाले आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची दररोजची संख्या धडकी भरवणारी ठरली. शहरातील एका दिवसाची रुग्णसंख्या ७००० हून अधिक नोंदवली गेली. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ८२ टक्क्यांपर्यंत घट झाली. मे महिन्यातील आकडेवारी काहीशी दिलासादायक ठरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के होते, तर दुसऱ्या आठवड्यात ते ९३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १४.४६ टक्के इतका कमी झाला. १७-२३ मे या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट ९.२६ इतका, तर शेवटच्या आठवड्यात ७.५ टक्के नोंदवला गेला आहे.

रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने शहरातील दररोजच्या चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. १७ मे ते २३ मे या आठवड्यात ७४,७६१ इतक्या चाचण्या झाल्या होत्या. २४ मे ते ३० मे या कालावधीत ५७,४९५ इतक्या चाचण्या पार पडल्या. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रिकव्हरी रेट ८२ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रिकव्हरी रेट ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शेवटच्या आठवड्यात ९४ टक्के रिकव्हरी रेट नोंदवला गेला आहे.

कालावधी पॉझिटिव्हिटी रेट

२४ मे - ३० मे ७.५

१७ मे - २३ मे ९.२६

१० मे - १६ मे १४.४६

३मे - ९ मे १५.८३

---------------

दिनांक सक्रिय रुग्ण घरी गेलेले रुग्ण

२९ मे ७०४४ १०२३

२६ मे ८३५६ ११५८

१९ मे १५२३२ २४०७

१२ मे २७०१४ ४५६७

५ मे ३९७३२ ३३०३

Web Title: Last week, the positivity rate fell from 25 per cent to 7.5 per cent, while the recovery was 94 per cent.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.