काटेवाडीला स्व. आर. आर. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:59+5:302021-02-21T04:15:59+5:30
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चकाचक काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीला ...
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
काटेवाडी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चकाचक काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील स्वच्छ सुंदर गाव प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. जिल्हा परिषदच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. काटेवाडीचे संरपच विद्याधर काटे व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोर्इटे यांना उपमुख्यमत्री अजित पवार यांच्या हस्ते सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारने काटेवाडीकराची मान उंचावली आहे. गावच्या स्नुषा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काटेवाडीने स्वच्छता अभियानातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सह, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण, अंगणवाडी, कुपोषणसह दिव्यांग योजना, जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून स्वच्छ पाणीपुरवठा या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय कामामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे संरपच विद्याधर काटे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी सागितले. हा पुरस्कार जाहीर होताच ग्रामस्थाच्या वतीने आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
...या पुरस्काराने जबाबदारी वाढली
देशातील पहिले इको व्हिलेज म्हणून काटेवाडीची ओळख आहे. सायबर ग्राम, पर्यावरण ग्राम, कृषिग्राम, विमाग्राम, तंटामुक्त ग्राम, असेच अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. मात्र स्व. आर. आर. पाटील यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळाल्याने काटेवाडी कराचा आनंद द्विगुणीत झाला आहे. उलट या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. काटेवाडीप्रमाणे इतर गावे सुंदर गाव करण्याचा मनोदय सुनेत्रा पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.