‘आयुष्मान भारत’ योजनेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:22+5:302021-02-15T04:10:22+5:30
धनकवडी : ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना पद्मावती, सहकारनगर, संभाजीनगर, शंकर महाराज ...
धनकवडी : ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना पद्मावती, सहकारनगर, संभाजीनगर, शंकर महाराज वसाहत भागातील हजारो बांधवांसाठी विकासाची पहाट ठरेल, असे गौरवोद्गार आमदार माधुरी मिसाळ यांनी काढले.
नगरसेवक महेश वाबळे यांनी आयोजित केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा शुभारंभ, भिलारेवाडी येथील अनाथ मुलांना खाऊचे वाटप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारतचे स्वप्न साकार व्हावे यासाठी गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमांत आमदार मिसाळ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
नि:शुल्क असणाऱ्या या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबाना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी ५ लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. ही योजना प्राथमिक स्तरावर सध्या पद्मावतीमध्ये राबविण्यात येणार असली तरी त्याचा लाभ संपूर्ण प्रभागासाठी होणार आहे. या वेळी नगरसेवक मानसी देशपांडे, रघुनाथ गौडा, गणेश लगस, जीतेंद्र पोळेकर, प्रंशात दिवेकर, प्रंशात थोपटे, कैलास मोरे, सारिका ठाकर संध्या नांदे, लहू जागडे, गणेश सुतार, संगीता चौरे, मालती अवघडे, गणेश वैद्य उपस्थित होते.
कोट
आयुषमान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा आरोग्यदायी लाभ प्रभागातील प्रत्येक कुटुंबांना होणार आहे. यामध्ये एकूण १ हजार १२२ आजारांचा समावेश असून या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी माझा प्रयत्न आहे.
-महेश वाबळे - नगरसेवक
फोटो : नगरसेवक महेश वाबळे यांनी आयोजित केलेल्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेचा शुभारंभ, भिलारेवाडी येथील अनाथ मुलांना खाऊचे वाटप करून करण्यात आला.