श्रीसमर्थ स्कूल व कॉलेजमध्ये "कमवा आणि शिका" योजनेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:35+5:302021-01-20T04:11:35+5:30
सध्याच्या स्थितीत ही योजना फक्त पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालय किंवा विद्यापीठात राबविली जाते. परंतु श्रीसमर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई ...
सध्याच्या स्थितीत ही योजना फक्त पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालय किंवा विद्यापीठात राबविली जाते. परंतु श्रीसमर्थ शिक्षण प्रसारक मंडळ मोई चे संस्थापक अध्यक्ष .शिवाजीराव बबनराव गवारे यांच्या संकल्पनेतून, सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून व मागेल त्याला काम मिळून देण्याच्या आवडीतून ही योजना पहिल्यांदाच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राबविली जात आहे.
या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैभव पोखरकर (संचालक : स्वप्नवेब सोल्युशन, मंचर तथा माजी एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ) हे लाभले. आपल्या मार्गदर्शनात अतिशय सोप्या शब्दात कमवा शिका योजनेची माहिती महत्व आणि व्यक्तिमत्व विकासातील कमवा शिकाचे योगदान हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव विद्याताई गवारे, श्री समर्थ ग्रामीण बि.शे.स.पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल गवारे, श्रीसमर्थ स्कूल अँड कॉलेजच्या प्राचार्या अनिता टिळेकर, श्रीसमर्थ वाचनालयाचे सल्लागार विलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जीवन साळवे, शोभा तांबे, अजित थोरात, रत्नाकर वाघमारे, संजय काष्ठे, तेजश्री लगड, ललित बडदे, नीलम डोंगरे, कु. हर्षाली सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ११ वी वाणिज्य शाखेतील निकिता मुंढे, नेहा कांबळे, सोनाली केंगार, मयूरी धायगोडे यांनी केले. आभार प्रदर्शन आसाराम मुंढेनी केले.