चांडोली ग्रामीण रुग्णालयात करोना लसीकरण मोहीम शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:47+5:302021-01-17T04:10:47+5:30
कोरोना लसीकरणचा पहिला डोस चांडोली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेविका रसिका कुदळे यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांना मिळाला. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार मोहिते ...
कोरोना लसीकरणचा पहिला डोस चांडोली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेविका रसिका कुदळे यांच्यासह दहा कर्मचाऱ्यांना मिळाला. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपसभापती चागंदेव शिवेकर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य अंकुश राक्षे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, वैद्यकीय अधीक्षिका डॉ.नंदा ढवळे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बळीराम गाढवे, सार्वजनिक बाधंकाम विभागाचे उपअभियंता एम.एस.भिगांरदिवे, डॉ.प्रदीप शेवाळे, डॉ.दीपक मुंढे, डॉ.वाडेकर, डॉ.तायडे आदीसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कडुस प्राथमिक केंद्रावर करोना लसीकरण मोहीम वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार रद्दबातल करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील करोना व्हॅक्सिन लसीचा डोस चांडोली ग्रामीण रुग्णालयातून देण्यात येणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात १३० लसीचे डोस प्राप्त झाले असून, मोबाइल मॅसेजवरून येणाऱ्या डॉक्टर आणि आणि कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण केल्यानंतर, व्हॅक्सिन लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणे दोन हजार आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाचे मॅसेज मोबाइलवर प्राप्त झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर अर्धा-पाऊण तास संबंधित लाभार्थ्याना निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर सोडण्यात येणार असल्याची माहिती डॉ.दीपक मुंढे यांनी दिली.